CM Eknath Shinde : पर्यावरण संवर्धनासाठी जन आंदोलनाची गरज, आता ऑक्सिजनपेक्षा ओझोन महत्वाचा : मुख्यमंत्री
जीवनात आता ऑक्सिजनपेक्षा ओझोन महत्वाचा बनला आहे. ओझोन नसेल तर जगण मुश्किल होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं.
CM Eknath Shinde : जीवनात आता ऑक्सिजनपेक्षा ओझोन महत्वाचा बनला आहे. ओझोन नसेल तर जगण मुश्किल होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात 'जागतिक ओझोन दिवसा' (World Ozone day) निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. आज देशात जल, वायू परिवर्तन, मानव संसाधनावर मोठं संकट आहे. यामुळं संपर्ण जग चिंतेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरण संवर्धनासाठी जन आंदोलनाची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
ओझोनच्या कमतरतेमुळं ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेंट चेंज तसेच इको सिस्टीमवर परिणाम होत असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कधी पाऊस येतो तर कधी पाऊस गायब होतो असे शिंदे म्हणाले. आपण सर्वांनी उर्जेची बचत केली पाहिजे. याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. आजच्या या जागतिक ओझोन दिवसा निमित्त पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे देखील मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. पर्यावरण संवर्धनासाठी जनआंदोलनाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रदुषणामुळं दिवसेंदिवस ओझोनचा थर कमी , जगभरात हा चिंतेचा विषय
ओझोनचा थर हा सुर्याच्या हानीकारक किरणांपासून आपलं संरक्षण करतो. तसेच वातावरणात एक संतूलन ठेवतो. पण प्रदुषणामुळं दिवसेंदिवस ओझोनचा थर कमी होत आहे. त्यामुळं जगभरात हा चिंतेचा विषय बनला आहे. याचा मानवी जीवनावर देखील प्रतिकूल परिणाम होत असल्याचे शिंदे म्हणाले. त्यामुळं ओझोन आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा घटक असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळं याबाबत जागृती निर्माण करणं गरजेचं आहे, त्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. भावी पिढ्यांसाठी ओझोन थरांचं रक्षण करणं चालू ठेवलं पाहिजे. यासाठी पर्यावरण पूर वस्तू वापरणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकार पर्यावरणाचे रक्ष करण्यासाठी कटिबद्ध
ओझोन दिवस हा पर्यावरणासाठी अत्यंत घटक आहे. त्यामुळं ओझोनच्या थराचं रक्षण करण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकार देखील पर्यावरणाचे रक्ष करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच पर्यावरणासंबंधी राज्य सरकार केंद्र सरकारच्या धोरणांना पूर्ण सहकार्य करेल असे देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: