एक्स्प्लोर

Eknath Shinde : तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या 101 कौशल्य केंद्रांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

मुंबई : पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावं. या योजनेअंतर्गत  2028 पर्यंत, राज्यात साधारण तीन लाख कारागीरांना  विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथी गृह येथे पी.एम.विश्वकर्मा  कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील 101 केंद्रांच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी,महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मनी,केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सचिव अतुल तिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील,राज्यातील 15 जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्वकर्मा केंद्राचे संचालक, स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित  होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र या  पी.एम.विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून  नवनवीन  स्टार्टअपही सुरू व्हावीत. या स्टार्टअपनी जागतिक स्पर्धेत उतरावं. पी.एम.विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजेनेच्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 101 तुकड्यांना आपण हे प्रशिक्षण देतोय. आगामी काळात अन्य जिल्ह्यांतही  या  प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल. त्याला सर्वतोपरी पाठबळ दिलं जाईल.कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागानंही आपल्या नावासारखंच काम सुरु केलंय असे म्हणून त्यांनी मंत्री श्री.लोढा यांचे कौशल्य उपक्रम नवीन राबविल्याबद्दल अभिनंदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की,महाराष्ट्रात आपण कौशल्य विकासासाठी मुंबईसह, नागपूर, पुणे इथं कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केली आहेत. राज्यात नमो रोजगार अभियानांतर्गत  नमो महारोजगार मेळाव्यांचं आयोजन करतो आहोत. नागपूर मध्ये असा यशस्वी मेळावा आयोजित केला गेलाय. लवकरच ठाण्यामध्ये हा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र हे उद्योगाभिमुख, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि प्राधान्य देणारं राज्य आहे. त्यामुळंच आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येतेय. दावोस मध्ये 3 लाख 83 हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून अनेक रोजगार निर्माण होतील असा विश्वास आहे असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील 101 केंद्रांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोट द्वारे बटन दाबून शुभारंभ करण्यात आला.

राज्यात अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले,कौशल्य विकास विभाग राज्यात जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर देत असून,राज्यात 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे सुरू झाली आहेत.आज पी.एम.विश्वकर्मा सन्मान योजना देखील 15 जिल्ह्यात 101 ठिकाणी सुरू करत आहोत.यापुढे जावून ही संख्या वाढविण्यात येईल.नमो महारोजगार मेळावे, रोजगार मेळावे यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देवून प्रत्येक हाताला काम देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

कौशल्य विद्यापीठाचा एन.एस.डी.सी. आणि रूबिका फ्रांस सोबत सामंजस्य करार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (NSDC) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ बरोबर कौशल्य विकासाच्या विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार केला. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण व प्रमाणपत्र तसेच क्रेडिट ट्रान्सफरचाही समावेश आहे. 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने रुबिका फ्रांस या जागतिक दर्जाच्या विख्यात डिझाईन संस्थेसोबत सामंजस्य करार केला. या करारा अंतर्गत विद्यापीठाने या अंतर्गत डिझाईन, अनिमेशन, गेमिंग, यू आय स्किल्स या अभ्यासक्रमाचे तसेच  आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट, स्टूडंट एक्चेंज चा अंतर्भाव असून यातून विद्यार्थाना डिझाईन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रमुख वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये अठरा व्यवसायामध्ये  सुतार, होड्या बनवणारे, हत्यारे बनवणारे, लोहार, टाळा बनवणारे, हातोडा आणि टूलकिट बनविणारे, सोनार, कुंभार,  मूर्तीकार, चांभार, मेस्त्री, चटई आणि झाडू बनवणारे, पारंपारिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे विणणारे कारागीर या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या विविध 18 व्यवसायांच्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूलकिटसाठी 15 हजार रुपयांचे ई-व्हाऊचर विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना एक लाख रकमेचे 5 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.पहिल्या हप्त्याच्या कर्जाची परतफेड नियमित असल्यास लाभाथ्यांना पुढील रू. दोन लाख रकमेचे 5 टक्के व्याजदराचे कर्ज मिळेल. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे.राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 101 प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणात सुरुवात करण्यात येणार आहे.

राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वकर्मा योजनेसाठी जिल्हा अंमलबजावणी समिती गठीत झाली आहे. या योजनेत 18 व्यवसायाच्या लाभार्थ्यांना त्यांची नोंदणी जवळच्या नागरी सेवा केंद्रात करायचे आहे. ग्रामपंचायत व शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेबद्दल जनजागृती करावी. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत संपूर्ण भारतातील 30 लाख महाराष्ट्रात साधारण तीन लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget