एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील आठ खेळाडूंना सरकारी नोकरी
मुंबई : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतलं जाणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर या समितीनं आठ खेळाडूंना शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
कुठल्या खेळाडूची कोणत्या विभागात नेमणूक?
या प्रस्तावानुसार धावपटू कविता राऊतची आदिवासी विकास विभागात नेमणूक केली जाईल. पैलवान संदिप यादव, तलवारबाज अजिंक्य दुधारे आणि तिरंदाज नीतू इंगोले यांची क्रीडा विभागात क्रीडा मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली जाईल. वेटलिफ्टर ओंकार ओतारी आणि कबड्डीपटू नितीन मदने यांना महसूल विभागात तहसीलदारपद मिळणार आहे. तर नेमबाज पूजा घाटकरची विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षकपदी आणि कबड्डीपटू किशोरी शिंदेची नगरविकास विभागात नेमणूक केली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement