एक्स्प्लोर
Advertisement
जमीन घोटाळ्याचा आरोप म्हणजे राजकीय अफवा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने सिडको जमीन विक्रीमध्ये सतराशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काल काँग्रेसने केला होता. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
नागपूर : “सिडको जमीन घोटाळ्याचा आरोप म्हणजे राजकीय अफवा आहे,” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आरोपाला उत्तर दिले आहे. तसंच राजकीय अफवांना राजकीयच उत्तर मिळेल, असा पलटवारही त्यांनी काँग्रेसवर केला.
मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने सिडको जमीन विक्रीमध्ये सतराशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काल काँग्रेसने केला होता. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
“हा भूखंड सिडकोचा नाही. रेडीरेकनरच्या दरानुसार या जमिनीची किंमत 5 कोटी 30 लाख एवढी असून जमीन देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना नसतात तर जिल्हाधिकाऱ्यांना असतात,” असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आरोप फेटाळले.
“काँग्रेसने आरोप करताना भतिजा या बिल्डरचं नाव घेतलं पण मागच्या सरकारमध्ये या भतिजांचे चाचा कोण होते हे समोर आणले जाईल,” असं म्हणत त्यांना आधीच्या आघाडी सरकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
विरोधकांना जी चौकशी हवी आहे त्या चौकशीला आपण तयार आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
काय होता काँग्रेसचा आरोप?
‘नवी मुंबईतील सिडकोची सतराशे कोटी रुपयांची 24 एकर जमीन मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अवघ्या तीन कोटींना बिल्डरला देण्यात आली. ज्यांना ही जमीन स्वस्त दरात दिली गेली ते मनीष भतिजा आणि संजय भालेराव हे बिल्डर भाजपचे विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांच्या जवळचे आहेत,’ असा आरोप काँग्रेसने केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
परभणी
क्राईम
Advertisement