CM Uddhav Thackeray : "देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात, राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका"
मद्यराष्ट्र म्हटल्याने केवळ महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत.
CM Uddhav Thackeray : देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात आहे, त्यामुळे विरोधकांनी महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं चुकीचं आहे. मद्यराष्ट्र म्हटल्याने केवळ महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलंय. तसेच त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला आहे,
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका,
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं खूप मोठी चूक आहे. देशात सत्ता आली तरी काहींचा जीव मुंबईत गुंतलाय. आपला तो बाब्या..असं वागू नका, चांगली कामं विरोधकांना कधी दिसतच नाही, मी जन्मानं मुंबईकर, मला याचा अभिमान आहे. रावणाची जीव बेंबीत, तसा काही जणांचा मुंबईत आहे. असं वक्तव्य करत मुख्यमंत्री ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला आहे,
राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती ,
राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती आहे, विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालाकडे जातात असं मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या तक्रार राज्यपालांकडे नोंदवतो, विरोध तुम्ही करु शकता मात्र त्याला काही सीमा असतात. राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नव्हता.
रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काही जणांचा जीव मुंबईत
रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार
विधानसभेत घेतला. राज्यातील परिस्थिती न पाहता तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. राम आणि रावणच्या गोष्टीसारखी परिस्थिती आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता त्याचप्रमाणे अनेकांना केंद्रात सत्ता मिळाली पण जीव मात्र मुंबईत आहे. आठ भाषांत शिक्षण देणारी एकमेव मुंबई महापालिका आहे. कोविड संदर्भात अनेक ठिकाणी कौतुक करण्यात आले. कोविड बरा झाला पण ज्यांना द्वेषाची कावीळ झाली असेल तर काय करणार? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
MLA Houses In Mumbai : व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला?
MLA Houses In Mumbai : "आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर..." जितेंद्र आव्हाडांनी केले स्पष्ट
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला