एक्स्प्लोर
मी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागतो : मुख्यमंत्री
नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर : नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे. काल (शुक्रवार) कोल्हापुरातल्या वारणामध्ये ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारले. यावेळी नाभिक समाजाच्या विधानाबाबत विचारलं असता आपला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
'माझ्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्याचं लक्षात येताच मी एक पत्रक काढून तात्काळ माफी मागितली होती. समाजापेक्षा मी मोठा नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.' असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
VIDEO :
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 नोव्हेंबर रोजी पाटस येथील साखर कारखान्याच्या उद्घघाटनावेळी नाभिक समाजावरुन वक्तव्य केलं होतं. आघाडी सरकारच्या काळातील सिंचन योजनांवर खर्च केलेल्या पैशांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यासाठी त्यांनी नाभिकाचं उदाहरण दिलं होतं.
दरम्यान, यावरुन मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे नाभिक महामंडळाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यावर दिलगिरी व्यक्त करत असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
नाभिक समाज आक्रमक, 11,000 जण मुंडन करुन केस मुख्यमंत्र्यांना देणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement