Chhagan Bhujbal : ''महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, कारण...'' छगन भुजबळांनी गणित सांगितलं, जरांगेंवर हल्ला
Maharashtra Politics News : महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, कारण सगळे मराठा कुणबी होत आहेत, असं वक्तव्य मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.
Chhagan Bhujbal on Manoj Jarange : महायुती सरकारमधील मंत्री आणि ओबीसी समाजाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) एवढे निराश का झाले आहे? की ते त्यांच्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे का? आज नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी (Maharashtra Assembly Winter Session) दाखल होताच छगन भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकीच नव्हती, तर भुजबळांच्या मनातील नैराश्य आणि रोष प्रकट करणारी ही होती. महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, कारण सगळे मराठा कुणबी होत आहेत, असं वक्तव्य मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.
''महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत''
महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, आता विधिमंडळात ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चेची आवश्यकताच नाही, कारण सर्व मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा आता महाराष्ट्रमध्ये शिल्लक राहणार नाही. सर्व कुणबीच होणार आहेत. तुम्ही किती ही क्युरेटिव्ह पिटीशन करा किंवा नवीन बिल आणा, मात्र जर सर्व मराठा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये येत आहेत, तर बाहेर कोण राहणार आहे.
ओबीसीमध्ये फूट पाडण्याचं काम
तुम्ही निराश झाले आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळांनी सांगितलं की, ''अरे असंच चाललेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व लोक राजीनामा देत आहेत, तो आयोग आता ओबीसीचा राहिलेला नाही. तो मराठा आयोग झालेला आहे. जरांगेचा रोजचं काम आहे बोलणे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोणी ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहे.''
'महाराष्ट्रात मराठा शिल्लक नाही, सर्व कुणबी'
''आता ज्याप्रमाणे दादागिरीने कुणबी सर्टिफिकेट घेतात, खोटी सर्टिफिकेट घेतात. तसेच पुढे सुद्धा होणार आहे. जात पडताळणीच्या वेळेलाही असेच होणार आहे. कोणी फोन करणार, कोणी दादागिरी करणार आणि जात पडताळणी करून घेणार, जर सर्व मराठा ओबीसीमध्ये येणार असतील तर, काय करायचं ओबीसीवर चर्चा घेऊन. सर्व सर्टिफिकेट घेत आहेत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, न्यायमूर्ती शिंदे गावोगावी फिरवून सर्टिफिकेट द्या सांगत आहे. आता काही शिल्लक राहिलेले नाही, आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक नाही, सर्व कुणबी झाले आहेत'', असं भुजबळ म्हणाले आहेत.
जरांगेना कोण उंचीवर चढवतंय?
भुजबळ पुढे म्हणाले की, ''अ ब क ड करण्याच्या मागणी संदर्भात यापूर्वी अभ्यास झालेला आहे आणि सवलती दिलेले आहे. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांनी अभ्यास करावा आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करू नये. जरांगे पाटील कसला हॅविवेट आहे, त्याला कोणीतरी उंचीवर घेऊन जात आहे. त्याच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत, हेवीवेट वगैरे तो काही नाही.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :