Manoj Jarange : 'आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल', जरांगेंनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली?
Manoj Jarange on Maratha Reservation : आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. यानंतर जरांगे यांनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली का, असा सवाल उपस्थित होत आहे.
Manoj Jarange Latest : आरक्षण (Maratha Reservation) दोन दिवस उशिरा मिळालं तरी चालेल. पण सर्व शांततेने करू असं वक्तव्य मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) केलं आहे. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) डेडलाईन बदलली का, असा सवाल उपस्थित होत आहे. आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये मनोज जरांगे, ओबीसी, धनगर आणि बारा बलुतेदार, अलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी जरांगे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना आधीच्या वक्तव्यावर सारवासारव केली.
डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच नाही
माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच नाही. मी बोलीभाषेतले शब्द वापरल्याने गैरसमज होऊ देऊ नका. 24 डिसेंबर ही डेडलाईन कायम आहे, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, मराठा आणि ओबीसी आता हातात हात घालून काम करणार आहे, यासाठीच पुसदच्या बैठकीत चर्चा झाली. कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवं ही माझी भूमिका नाहीच. माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालू नका. मला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका - जरांगे
यावर स्पष्टीकरण देताना जरांगे यांनी म्हटलं आहे की, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही. शब्दश: अर्थ घेऊ नका. हे समाज मोठा आहे, समाजासोबत संवाद साधताना बोली भाषेतील शब्द वापरणं गरजेचं असतं. समाजाचा विश्वास संपादन करताना मराठवाड्याकडचे शब्द वापरले, दोन दिवस उशीरा याचा शब्दश: अर्थ घेऊ नका, असं जरांगे म्हटलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेचा भुजबळांवर निशाणा
मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधताना म्हटलं की, ''येवल्याचा म्हणतो आरक्षणाची एसटी पुर्णपणे भरलेली आहे. आम्हाला त्यात डोकावून तर पाहू देत. तू गाडीच्या काचा बंद केल्यात. ते स्वत:ला ओबीसींचा नेता म्हणत असतील तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी शिफारस करायली हवी होती. वेगळा प्रवर्ग तयार करून हे (मराठा समाज) माझेच भाऊ आहेत, माझ्याच ओबीसीतल आहेत, त्यांचं लगेच वेगळं करा. त्यांना भांडायची काय गरज. त्यांचे हे भाऊ आहेत ना, जे त्यांना सभेला गर्दी करायला लागतात. पण, त्यांची पोरं-बाळं उघड्यावर पडणार असली तर, यांना वेगळं आरक्षण द्यायला काय अडचण आहे.'' असा सवाल जरांगे यांनी भुजबळांवर उपस्थित केला आहे.
Exclusive व्हिडीओ पाहा : आरक्षण उशिरा मिळालं तर चालेल? मनोज जरांगेंच्या वक्तव्याचा अर्थ काय?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा फैसला होणार! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष