'मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे आता ओबीसीत आरक्षण द्या म्हणतायेत. वेगळे आरक्षण दिल्यानंतरही ते ओबीसीतून आरक्षण द्या असे म्हणतात, त्याला आमचा सक्त विरोध आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Chhagan Bhujbal on Manoj jarange Patil : राज्यात कुणबीकरण सुरु आहे. खोटी प्रमाणपत्र दिली जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यायला विरोध नाही. तर कुणबी करणाला आमचा सक्त विरोध आहे. मनोज जरांगे (Manoj jarange) आता ओबीसीत आरक्षण द्या म्हणतायेत. वेगळे आरक्षण दिल्यानंतरही ते ओबीसीतून आरक्षण द्या असे म्हणतात, त्याला आमचा सक्त विरोध आहे. आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये, असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटलांना दिला आहे.
आज मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मुसदा विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून मराठा आरक्षण नको
छगन भुजबळ म्हणाले की, बऱ्याच महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलनं करत आहेत.आधी जे मोर्चे झाले त्यावेळी शांततेत मोर्चे झाले. मात्र यावेळी ओबीसी समाजाला टार्गेट करण्यात आले. ओबीसींना ज्या पोलिसांनी दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक झाली. आमची इतकीच मागणी होती की, कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून मराठा आरक्षण नको, असे त्यांनी म्हटले.
आम्ही विरोध करायचा विषय नव्हता
देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं ते सुप्रीम कोर्टात नामंजूर करण्यात आले. ते का करण्यात आले याचा अभ्यास करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली. शुर्क्रे यांच्या अध्यक्षतेखाली अडीच कोटी घरांचा सर्वे करण्यात आला. आज कॅबिनेट समोर आणि विधीमंडळात बिल मांडण्यात आले आणि 10 टक्के आरक्षण देण्यात आले. आम्ही विरोध करायचा विषय नव्हता. कारण 10 टक्के हे वेगळं आरक्षण देण्यात आलं आहे.
मनोज जरांगेंच्या मागणीला सक्त विरोध
विधानसभेत आज बोलायचा प्रयत्न केला. वेगळे आरक्षण दिल्यानंतर आता जरांगे म्हणत आहे की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. याला आमचा सक्त विरोध आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देत आहे. केवळ एका जातीला सरकार 10 टक्के आरक्षण देत आहे. आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये. सध्या कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात येत आहेत. यात बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत.
हाताने खोडून दाखल्यावर मराठा कुणबी लिहिलं जातंय
जे मागासवर्गीय आहेत त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. वंजारी समाजाच्या व्यक्तीला देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हाताने खोडून दाखल्यावर मराठा कुणबी लिहिले जात आहे. काहींना मराठी कुणबी असे देखील प्रमाणपत्र देण्यात आली आहे. एकाच दाखल्यावर मराठा म्हणून प्रमाणपत्र आहे आणि दुसरीकडे कुणबी असा ही उल्लेख करण्यात आला आहे. सगेसोयरे आले पाहिजेत, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे, या मागणीला आमचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा