एक्स्प्लोर
दारुबंदीवर चर्चेसाठी उत्पादन शुल्क मंत्रीच थेट राळेगण गाठणार
अहमदनगर : दारुबंदी आणि ग्राम रक्षक दलासंदर्भात चर्चेसाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज स्वत: राळेगणसिद्धी गाठणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या दोन्ही गोष्टीत काही दुरुस्त्या सूचवल्या होत्या. त्यावर या भेटीत चर्चा केली जाणार आहे.
दारुबंदी कायद्याचा सुधारीत अंतीम मसुद्यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि अण्णा हजारेंमध्ये चर्चा होणार आहे.
दारु बंदी आणि ग्राम रक्षक दला संदर्भात अण्णांनी काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. या संदर्भात अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांच्याशी पत्र-व्यवहारही केला होता. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: लक्ष दिले आहे.
यावेळी पांगरमल बनावट दारुकांडावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. अण्णांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक आणि उत्पादन शुल्क अधीक्षकांवर ही कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे या भेटीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अण्णांच्या सर्वच मागण्यांना मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद दिला जातो आहे. त्यातच उत्पादन शुल्क मंत्री थेट राळेगणला अण्णांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अण्णांना नाराज न करण्याचं धोरण अवलंबल्याचं पहायला मिळतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement