एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chandrapur : चिंताजनक! विदर्भात पावसाळ्यात वाघांच्या हल्ल्यात लक्षणीय वाढ, स्थानिक लोकांच्या सुरक्षेचं काय?

Chandrapur Tiger attack issue : पूर्व विदर्भात वाघांच्या हल्ल्यात लक्षणीय वाढ झाली असून या वर्षी पावसाळ्यात झालेले हल्ले तर चिंताजनकच म्हणावे लागतील.

Chandrapur Tiger attack issue : पूर्व विदर्भातील (Vidarbha News)  3 जिल्ह्यात 13 जणांचा बळी घेणाऱ्या CT वन वाघाला (Tiger Attack News) जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. मात्र असं असलं तरी पूर्व विदर्भात वाघांच्या हल्ल्यात लक्षणीय वाढ झाली असून या वर्षी पावसाळ्यात झालेले हल्ले तर चिंताजनकच म्हणावे लागतील. विदर्भाला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. मुबलक जंगल, प्रेबेस, हेल्दी जीन पूल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकांची वाघांप्रती असलेली सहिष्णुता यामुळे वाघांसाठी देशातील सर्वाधिक सुरक्षित आणि उज्वल भविष्य असलेला भाग म्हणून तज्ज्ञ विदर्भाकडे पाहतात. मात्र असं असलं तरी वाघांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक लोकांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न आता दखल घ्यावा इतका गंभीर बनला आहे.
 
बारमाही सिंचनाची सुविधा नसलेल्या विदर्भात डिसेंबर-जानेवारी उजाडला की शेतीची कामं संपतात आणि त्यानंतर ग्रामस्थ तेंदूपत्ता, मोहफुलं, बांबू, लाकूडफाटा आणि गवत गोळा करण्यासाठी जंगलाकडे वळतात आणि त्यामुळे या काळात वाघांचे हल्ले होतात आणि लोकं मृत्युमुखी पडतात ही थियरी आता सर्वमान्य झाली आहे. मात्र आता या थियरी ला छेद देणाऱ्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे साधारणपणे जुलै ते सप्टेंबर दरम्यान सहसा वाघाचे हल्ले होत नाही असं मानलं जात मात्र या वर्षी पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात 9 जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय तर पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात 6, भंडारा जिल्ह्यात 3 तर वर्धा जिल्ह्यात 2 जण वाघाच्या हल्ल्याचे बळी ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाळ्यात वाघांच्या हल्ल्यात 2021 मध्ये 7, 2020 मध्ये 5 तर 2019 मध्ये अवघ्या 2 जणांचा बळी गेला होता.

पावसाळ्यात वाघांचे हल्ले वाढल्यामुळे वाघांच्या हल्ल्यांसंबंधातल्या सध्या असलेल्या थिअरीज कालबाह्य झाल्या आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यावर तातडीने कारणांचा शोध घेऊन उपाय करणं आवश्यक आहे. विशेषतः वाघांचे भ्रमण मार्ग सुरक्षित करणे आवश्यक आहे, कारण याच भ्रमणमार्गांचा वापर करून वाघ पावसाळ्यात स्थलांतरण करतात.
 
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या जीव आणि वित्तहानीसाठी सरकारने नुकसानभरपाईच्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे. मात्र फक्त पैसे देऊन सरकार आपले हात झटकू पाहत आहे का हा देखील प्रश्न आहे. विदर्भात फक्त जंगल, वाघ आणि पर्यटक वाढतील या कडे लक्ष देण्याऐवजी सरकारने स्थानिकांच्या जीवाचे मोल देखील ओळखले पाहिजे. 

ही बातमी देखील वाचा

Bhandara CT1 Tiger : 4 जिल्ह्यात दहशत, 4 शेतकऱ्यांचा मृत्यू; वाघाच्या कोंबिंग ऑपरेशन वन विभाग सज्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरतीDombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget