एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chandrapur : कुत्र्याच्या अपघाती मृत्यूसाठी तीन लाखांची नुकसान भरपाई, तब्बल आठ वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल

कुत्र्याच्या अपघाती मृत्यूसाठी दोषी असलेल्या बसचालक आणि इन्शुरन्स कंपनीकडून मालकाला तीन लाख रुपये भरपाई मिळाली. अशी भरपाई मिळण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी असं मानलं जात आहे.

चंद्रपूर : कुत्र्याच्या अपघातास जबाबदार असलेल्या व्यक्तीने कुत्र्याच्या मालकाला तीन लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे.अंसारी यांनी दिला आहे. एखाद्या कुत्र्याच्या अपघाती मृत्यूनंतर भरपाई मिळण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी असं मानलं जात आहे. या प्रकरणातील कुत्र्याच्या मालकाचे नाव उमेश भटकर आहे तर कुत्र्याचे नाव जॉन असे होते.

चंद्रपुरात रस्त्यावरील एका अपघातात कुत्रा ठार झाला. हा कुत्रा मालकाचा जीव की प्राण होता. त्याच्या मृत्यूचे मालकाला अतीव दुःख झाले. दुःखावेग आवरल्यावर लाडक्या कुत्र्याला न्याय मिळवून देण्याचे त्याने ठरवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल 8 वर्षे न्यायालयीन लढाई लढली. अपघाताला दोषी असलेला बसचालक आणि इन्शुरन्स कंपनीकडून तीन लाख रुपये भरपाई मिळवली. चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच घडले असावे.

चंद्रपूर शहरातील तुकुम येथील रहिवासी उमेश भटकर 10 जानेवारी 2013 ला सकाळी 6.30 वाजता आपल्या 11 महिन्यांच्या लाडक्या कुत्र्याला अय्यप्पा मंदिराजवळ फिरवत होते. तेवढ्यात भरधाव असलेल्या स्कूल बसने गोपाल दूध डेअरीच्या जवळ जॉनला धडक दिली. यामध्ये जॉनचा मृत्यू झाला. मेसर्स रहीम ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक एम एच 40 एन 3766 ने हा अपघात झाला होता. यानंतर भटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जॉनचे शवविच्छेदनही करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार अपघातात जॉनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोषी असलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या विरोधात भटकर यांनी दीर्घ न्यायालयीन लढाई लढली आणि अखेर न्यायालयाने भरपाई देण्याचा आदेश दिला.

जॉनचा मृत्यू झाल्यानंतर अपघात दावा देण्याचा आदेश मोटर ॲक्सीडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल, चंद्रपूर ने दिला आहे. जॉन नामक हा कुत्रा आरती इन्फ्रा कंपनीमध्ये नोकरी करीत होता. तिथे हा कुत्रा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. मालक भटकर यांना त्याचे 8000 रुपये प्रतिमहिना वेतन मिळत होते. स्कूल बसचालकाच्या बेपरवाहीमुळे जॉनचा मृत्यू झाला. परिणामी भटकर यांचे दर महिन्याला 8000 रुपयांचे नुकसान होत होते. भटकर यांनी बसचे मालक आणि इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्याचा पाठपुरावाही केला पण काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्याय मिळविला.

ॲड. जयप्रकाश पांडेय यांच्या माध्यमातून मोटर ॲक्सीडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल, चंद्रपूरमध्ये प्रकरण दाखल केले. यामध्ये बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रहीम ट्रॅव्हल्स बस कंपनी आणि बसचालक सुधाकर थेरे या तिघांना दोषी धरले होते. भटकर यांनी 5 लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. हे प्रकरण न्यायालयात तब्बल 8 वर्ष चालले. अखेर उमेश भटकर यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. 1.62 लाख रुपये आणि त्यावर 8 टक्के दराने व्याज भटकर यांना द्यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझाMahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
Embed widget