एक्स्प्लोर
मुनगंटीवारांवर टीका केल्याने भाजप कार्यकर्त्यांची मारहाण
भाजपचे उपजिल्हाध्यक्ष बाबा भांगडे यांच्यासह दोन जणांविरोधात वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात एका स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केली. चंद्रपुरात ही धक्कादायक घटना समोर आली.
प्रवीण सुराणा असं या मारहाण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं नाव असून, ते वरोरा शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वरोऱ्यातील गांधी उद्यानात दोन विकासकामांचे उद्घाटन होणार होते. मात्र काही कारणांमुळे ते उद्घाटन न करता वणीला निघून गेले.
या प्रकरणावर प्रवीण सुराणा यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या विरोधात बाईट का दिला, याचा राग धरुन भाजपच्या 12-15 कार्यकर्त्यांनी आज सकाळी नागपूर नाका परिसरात सुराणा यांना मारहाण केली.
या प्रकरणी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष बाबा भांगडे यांच्यासह दोन जणांविरोधात वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारहाण झालेले सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement


















