एक्स्प्लोर

Assembly Election 2019 : कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील विजयी

पाटील हे पुण्याबाहेरील उमेदवार असल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. पाटील यांना भाजपने कोथरूडमधून उमेदवारी दिल्यावर त्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती. कोथरूडमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेरचा उमेदवार नको म्हणून नाराजी व्यक्त केली होती.

पुणे : कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी २५ हजाराहून अधिक मते मिळवत विजय मिळवला आहे. पाटील यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचा पराभव केला. कोथरूडमधून उमेदवारी जाहीर केल्यापासून पुण्यासह राज्याचे लक्ष या लढतीकडे होते. पाटील यांना आघाडीचा पाठिंबा होता. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. शेवटच्या क्षणी त्यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. कोथरूड हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. २०१४ मधील निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पाटील हे पुण्याबाहेरील उमेदवार असल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. पाटील यांना भाजपने कोथरूडमधून उमेदवारी दिल्यावर त्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती. कोथरूडमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेरचा उमेदवार नको म्हणून नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना आधी एखाद्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असा टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांना मतदारसंघातून निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्यावर पुन्हा एकदा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघाची निवड केली म्हणून टीका झाली होती. कोथरूड बाहेरचा उमेदवार नको म्हणूनही विरोधकांनी या मतदारसंघात प्रचार केला. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने कोथरूडमध्ये आपला उमेदवार न देता मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Tukaram Mundhe Marathi News: मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?
मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Tukaram Mundhe : 7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!
7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget