एक्स्प्लोर
'चला हवा येऊ द्या'च्या टीमकडून पाच एड्सबाधित विद्यार्थी दत्तक
लातूरः 'चला हवा येऊ द्या'च्या टीमने लातूर जिल्ह्यातल्या सेवालय या एड्सबाधित विद्यार्थ्यांच्या संस्थेतील पाच एड्सबाधित विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं आहे. तर हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी वैयक्तिक दोन एड्सबाधित विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं.
लातूर जिल्ह्यातील सेवालय ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून एड्सबाधित मुलांचे संगोपन करते. या संस्थेत सध्या एकूण 71 एड्सबाधित विद्यार्थी आहेत. प्रा. रवी बापटले यांनी या संस्थेची निर्मिती केली आहे.
सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत या संस्थेतल्या पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे देखील या विद्यार्थ्यांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं भारत गणेशपुरे यांनी सांगितलं.
'चला हवा येऊ द्या'च्या टीमने लातुरात येऊन सामाजिक बांधिलकी दाखवत एड्सबाधित मुलांना दत्तक घेतल्याचे कळताच शहरातील काही तरुणांनी एकत्र येत सेवालयाला आठ क्विंटल तांदूळ आणि गहू भारत गणेशपुरे यांच्या हस्ते भेट देऊन मदत केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement