एक्स्प्लोर

Central Railway : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्यांना पाच ते सहा तास उशीर, 'या' रेल्वेंचा मार्ग बदलला

Central Railway : देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Central Railway : देवळाली (Deolali) ते नाशिक (Nashik) दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर ही घडली घटना आहे. ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा अगोदरच अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा ओव्हरहेड वायर तुटली होती. तेथील काम पूर्ण झाल्यावर नाशिकरोडजवळ वायर तुटली. सध्या रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

या प्रकाराने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली असून चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे 11113 देवळाली - नाशिक पॅसेंजर ही गाडी प्रवासासाठी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तर इतर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. 

वळविण्यात आलेल्या गाड्या (Diverted Trains) 

- 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस – आझमगढ ही गाडी आज BSR-ST-JL-BSL- KNW मार्गे वळवण्यात आली आहे.

- 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा ही गाडी BSR-ST-JL-BSL-नागपूर मार्गे धावणार आहे.

- 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस BSR - ST - JL - BSL - KNW अयोध्या कैंट मार्गे वळविण्यात आली आहे. 

- 22223 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शिर्डी साईनगर ही गाडी कळवा - लोणावळा - पुणे - डौंड छावणी - शिर्डी साईनगर मार्गे वळवण्यात आली आहे.

या गाड्यांच्या वेळेत बदल (Rescheduling) 

- 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नांदेड पूर्वनिर्धारित वेळ: 05.30 वाजता होती. आता 08.30 वाजता प्रस्थान केले आहे. 

- 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर  पूर्वनिर्धारित वेळ: 06.35 वाजता, आता 10.00 वाजता प्रस्थान करणार आहे.   

मुंबईत आज मेगाब्लॉक, लोकल सेवांवर परिणाम

आज मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि हार्बर मार्गवर मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये सीएसएमटी ते वांद्रे आणि चुनाभट्टी पर्यंतच्या मार्गावर सेवा प्रभावित होईल. तसेच, पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावर गोरेगाव ते बोरिवली पर्यंत सकाळी 10 ते 3 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लॉक घेतला आहे.

आणखी वाचा 

Indian Railway : रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आता डिजिटल निगराणी, रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या, पण...; नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, काय-काय म्हणाले?
जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या, पण...; नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, काय-काय म्हणाले?
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Nashik Crime Hit and run: नाशिकच्या सातपूर परिसरात 'हिट अँड रन' चा थरार; रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात ट्रकने उडवलं, जागीच अंत!
नाशिकच्या सातपूर परिसरात 'हिट अँड रन' चा थरार; रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात ट्रकने उडवलं, जागीच अंत!
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Embed widget