एक्स्प्लोर

Indian Railway : रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आता डिजिटल निगराणी, रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

CCTV Camera in Indian Railway : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये आणि 15000 इंजिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे.

Indian Railway : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीत वाद होणे, महिला प्रवाशांच्या बाबतीत गैरप्रकार घडणे, प्रवासादरम्यान चोरी, अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने हे नवीन पाऊल उचलले आहे. सध्या प्रायोगिक स्वरूपात काही डब्यांत सीसीटीव्ही बसवले जाणार असून त्याचा सकारात्मक परिमाण सर्व डब्यांत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवले जाणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये आणि 15000 इंजिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेची आता प्रत्येक डब्यात डिजिटल निगराणी असणार आहे. 

पुढे आलेल्या माहितीनुसार,  प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ दोन कॅमेरे असतील. तसेच प्रत्येक डब्यामध्ये 4 डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एक पुढील बाजूस, एक मागच्या बाजूस आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशा प्रकारे प्रत्येक इंजिनमध्ये 6 सीसीटीव्ही असतील.

24 तास आधीच कळणार तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही

भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधीच मिळणार आहे. यापूर्वी फक्त 4 तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जात असे, त्यामुळे वेटिंग तिकिटधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र आता नवीन निर्णयाचा लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.हा नवा नियम लवकरच देशभर लागू केला जाणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तत्काळ तिकिटे पूर्वीप्रमाणे प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येतील व त्यांची कन्फर्मेशन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी आले कठोर नियम

रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी काही कठोर नियम लागू केले आहेत. वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. अशा प्रवाशांनी फक्त जनरल कोचमधूनच प्रवास करता येईल. जर कोणी वेटिंग तिकीट घेऊन एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना सापडले तर त्याला दंड आकारण्यात येईल.

तिकिटास दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येणार

आता स्लीपर क्लासच्या तिकिटाला फक्त दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येईल. स्लीपर क्लासचे तिकीट जास्तीत जास्त थर्ड एसी किंवा सेकंड एसीपर्यंतच अपग्रेड करता येईल, फर्स्ट एसीपर्यंत नाही. त्याचप्रमाणे, थर्ड एसीचे तिकीट जास्तीत जास्त फर्स्ट एसीमध्येच अपग्रेड करता येईल.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 February 2026: आज माघ अमावस्येचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! श्रीगणेशाच्या कृपेने विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य वाचा...
आज माघ अमावस्येचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! श्रीगणेशाच्या कृपेने विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य वाचा...
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Latur : हॉस्टेलच्या वादातून तरुणांमध्ये हाणामारी, लातुरात 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या
हॉस्टेलच्या वादातून तरुणांमध्ये हाणामारी, लातुरात 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget