एक्स्प्लोर
किल्ले रायगडाचं रुपडं पालटणार, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली.

किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांनी इतिहासाची साक्ष देणारा हा नवा दरवाजा आकर्षण बनला आहे.
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी एसआयएच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगडाच्या तटबंदीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येणार असून, पुरातत्व विभाग या कामावर लक्ष ठेवून असेल. या बैठकीला देशाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संभाजीराजे भोसले आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकारच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, आता हे काम लवकरात लवकर मार्गी लागावं अशी हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. VIDEO :
आणखी वाचा























