एक्स्प्लोर

Car Accident: शिंगणापूर घाटात 400 फूट खोल दरीत कोसळली कार, मायलेकाचा जागीच मृत्यू

Car Accident: नातेपुते पोलीस ठाण्यात (Natepute Police Station) अपघाताची नोंद करण्यात आलीय.

Car Accident: शिंगणापूर घाटात  (Shinganapur Ghat) कार दरीत कोळल्यानं मोठा अपघात घडलाय. या अपघात मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना सोमवारी घडलीय. नातेपुते पोलीस ठाण्यात (Natepute Police Station) अपघाताची नोंद करण्यात आलीय. पोलिसांनी दोघांच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. दरम्यान मायलेकरांचा अपघाती मृत्यू झाल्यानं थदाळे गावावर शोककळा पसरली आहे.

गजानन सर्जेराव वावरे (वय-58) आणि हिराबाई सर्जेराव वावरे अशी मृतांची नावे आहेत. गजानन हे थदाळे येथे वास्तव्यास असून महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस होते. गजानन आणि हिराबाई हे दोघे मायलेक सोमवारी थदाळे येथून सोसायटीच्या मतदानासाठी नाशिककडे निघाले होते. दरम्यान, शिंगणापूर- नातेपुते मार्गावरील भवानी घाटातून जात असताना वावरे यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गजानन आणि त्यांची आई हिराबाई यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झालाय. 

या घटनेची माहिती मिळताच शिंगणापूर व पिंपरी येथील 30 ते 40 साहसी युवक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, मदतीसाठी धावून आलेल्या युवकांनी 400 फूट खोल दरीत उतरून दोन्ही मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून दोरखंड आणि मानवी साखळीच्या मदतीनं दरीतून वर काढले. गजानन वावरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अपघाताची नोंद नातेपुते पोलीस ठाण्यात झाली असून नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. याप्रकरणी नातेपुते पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Pub : पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना Condom आणि ORS च्या पाकिटांचं वाटपDeepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नकाSrinagar To Jammu Railway Snowfall : बर्फाची चादर,रेल्वेची सफर; श्रीनगर-जम्मू स्वर्गाची सफरISRO Spadex Mission :इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं लाँचिंग,डॉकिंग-अनडॉकिंग क्षमतेत भारत होणार स्वावलंबी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
Pawan Kalyan On Allu Arjun : हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : आधी मोर्चात, आता CMO कार्यालयात; खास माणसाकडून बीड मोर्चाची माहिती मुख्यमंत्र्यांकडे
आधी मोर्चात, आता CMO कार्यालयात; खास माणसाकडून बीड मोर्चाची माहिती मुख्यमंत्र्यांकडे
काळ्या आईची पूजा, गावखेड्यात 'वेळ अमावस्या'; ठाकरेंच्या आमदारानेही केलं वनभोजन
काळ्या आईची पूजा, गावखेड्यात 'वेळ अमावस्या'; ठाकरेंच्या आमदारानेही केलं वनभोजन
संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
Embed widget