धक्कादायक! जावयाची हत्या करून चुलत सासऱ्याची आत्महत्या
Crime News : भांडणातून जावयाची हत्या केल्यानंतर सासऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली.
Crime News : चुलत पुतणीला त्रास देतो म्हणून तिच्या पतीची हत्या करणाऱ्या सासऱ्याने आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल होत असल्याचे समजल्यानंतर चुलत सासऱ्याने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना लातूर येथे घडली. उमेश देशमुख असे हत्या झालेल्या जावयाचे नाव असून शिवाजी शिंदे या चुलत सासऱ्याने त्याची हत्या केली.
लातूर शहराजवळील कातपूर येथील 37 वर्षीय शेतकरी उमेश देशमुख यांनी सोमवारी सोयाबीन विकले होते. शेतमाल विक्रीचा पैसा हाती आल्यानंतर उमेश देशमुख याने आपले काही मित्र आणि चुलत सासरा शिवाजी शिंदे यांच्यासोबत मद्य सेवन करण्यासाठी एमआयडीसी भागातील हॉटेलमध्ये गेला. अति मद्य प्राशन केल्यामुळे उमेश देशमुख हा सासऱ्याने चालवण्यासाठी घेतलेल्या साईधन लॉज येथे गेला. यावेळी शिवाजी शिंदे याची चुलत पुतणी म्हणजेच उमेश देशमुख याची पत्नीदेखील होती. उमेश पत्नीला त्रास देत होता. याचा जाब शिवाजी शिंदे याने उमेशला विचारला. यातून दोघांमध्ये वाद झाला आणि विकोपाचे भांडण झाले.
जावई आणि चुलत सासऱ्यामध्ये हाणामारीही झाली. शिंदे याने लॉजमधील पडद्यामागील रॉड काढून उमेशच्या डोक्यात मारला. या तीव्र हल्ल्याने उमेश जागीच कोसळला. भयभीत झालेल्या शिंदेने उमेश देशमुख मद्य प्राशन करून गोंधळ घालत असल्याची माहिती अनेकांना दिली. त्यानंतर काही नातेवाईक आणि मित्रमंडळी आली. घटनेचे गांभीर्य ओळखून काहींनी विवेकानंद पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येत असल्याचे समजल्यानंतर शिंदेने लॉजमधील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray : ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो : राज ठाकरे
- मिटकरी म्हणाले, भाजपने पैशाने निवडणूक जिंकली, चंद्रकांत पाटील म्हणतात, वा वा वा वा!
- Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरण सुनियोजित कट, SIT तपासात उघड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha