एक्स्प्लोर
Advertisement
गुंडाची पोलिसाला जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यातच धिंगाणा
अकोला: अकोल्यात गुंडानेच पोलिसाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गुंड पोलिसांना अश्लील शिवीगाळही करत होता. रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
अकोल्यातील सुरांगीनी बारमध्ये रविवारी रात्री रवी सरदार गेला होता. मात्र, बार बंद झाल्याने बारमालकाने त्याला मद्य देण्यास नकार दिला. यावर रवी सरदारने बारमध्ये गोंधळ घालत तोडफोड केली. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मात्र, रवी सरदारने पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला.
यावेळी सरदाराने कर्तव्यावर असलेल्या गोपाल जाधव या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला अन् त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. सोमवारी पोलीस कर्मचारी गोपाल जाधव यांच्या तक्रारीवरून रवी सरदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
क्राईम
भारत
Advertisement