कारला अचानक आग, स्फोट झाल्यानं 2 जणांचा होरपळून मृत्यू तर एकजण गंभीर, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
Buldhana Car Accident : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे.

Buldhana Car Accident : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. कारला अचानक आग लागल्यानं स्फोट झाला. यामध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार मुंबईवरुन अकोल्याकडे जात होती. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
कार चालकावर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर वरील चेनेज 318.8 जवळ मुंबईहून अकोल्याकडे जाणाऱ्या एका भरधाव कारला अचानक आग लागली. या आगीनंतर या कारचा स्फोट झाला आहे. कार अनियंत्रित झाल्यानंतर साईड बॅरिकेटला धडकून या कारला मोठी आग लागली. या अपघातात दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH - 04 LB 3109 मुंबई हुन अकोला कडे जात असताना हा अपघात झाला आहे. यात कारमधून प्रवास करणारे गणेश टेकाडे व राजू जायसवाल, मुंबई यांचा कारमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला. तर कारचालक अभिजित चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकावर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Accident : महाकुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील तिघांचा अपघात, निवृत्त प्राध्यापकांसह 3 जणांचा दुर्दैवी अंत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
