![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
काय म्हणता? बुलढाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस! अफवा पसरली अन् एकच झुंबड उडाली...
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद- नागपूर महामार्गावर डोनगावजवळ काहींना सोन्याच्या मण्यासारखे दिसणारे काही मणी पडलेले आढळले. बघता बघता ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
![काय म्हणता? बुलढाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस! अफवा पसरली अन् एकच झुंबड उडाली... Buldhana Rain News Updates gold Beads Rain at mumbai nagpur highway rumor काय म्हणता? बुलढाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस! अफवा पसरली अन् एकच झुंबड उडाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/db4bca4efbfd2e332e9af672ca9f1d33166028087493884_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Buldhana Rain News Updates : राज्यात सर्वत्र सध्या पावसाचा जोर (Maharashtra Rains Update) आहे. सततच्या पावसानं आता लोक परेशान झाले आहेत. पण जर कुणी तुम्हाला म्हटलं की सोन्याचा पाऊस पडतोय तर आपली प्रतिक्रिया काय असेल. असंच काहीसं घडलं बुलढाण्यात. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद- नागपूर महामार्गावर (Mumbai Aurangabad Nagpur Highway) डोनगावजवळ काल दुपारच्या सुमारास महामार्गाच्या कडेला काहींना सोन्याच्या मण्यासारखे दिसणारे काही मणी पडलेले आढळले. बघता बघता ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी या ठिकाणी मणी जमा करण्यासाठी धाव घेतली. महामार्गाच्या कडेला विखुरलेले मणी जमा करण्यासाठी प्रत्येक जण गर्दी करत होता. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
डोणगाव येथून जाणाऱ्या औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स ते मादणी फाट्यापर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूने सोन्याचे मणी पडलेले लोकांच्या नजरेत पडले. हे मणी ज्याला दिसले त्यांनी उचलण्यासाठी लगबग केली. त्यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबलेली होती. सोन्याच्या मण्याची माहिती मिळाल्यावर कित्येकाने रस्त्याच्या कडेला पडलेले मणी पाहण्यासाठी धावपळ केली.
अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. आणि पोलिस पोहोचल्यावर हे मणी सोन्याचे आहेत का? याची शहानिशा केली. मग मात्र सर्वजण भानावर आले. हे मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे निघाले. महामार्गावरून जाताना एखाद्या महिलेच्या गळ्यातील पोत तुटून रस्तावर विखुरले गेले असल्याचं लक्षात आलं. या घटनेमुळं महामार्ग मात्र बराच वेळ ठप्प राहिला. दोन तासांनी नागरिकांनी गर्दी कमी केली.
सोन्याचे मणी पाहून यावर मंथन सुरू झाले कोणी म्हणत की मोटारसायकल वरून महिला चालली असेल आणि तिच्या गळ्यात असलेली एखादी पोत तुटून पडली असेल तर काहींनी चोरट्यांनी पोलिसांच्या धाकाने कोणी सोन्याचे मणी फेकून दिले असतील असे विविध तर्क वितर्क लावत होते. काहींनी मणी फोडून पाहिले. तर मण्यांचे तुकडे झाले. हे सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्यासारखे दिसणारे नकली होते याची खात्री झाल्यानंतर अनेकांची निराशा झाली. खेर ही सोन्याच्या मण्यांच्या पावसाची अफवाच ठरली आणि ज्यांच्या हाती हे मणी लागले ते नागरिक हिरमुसले होऊन परतले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)