रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची (Accident) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडलं आहे.
Buldhana News बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची (Accident) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडलं आहे. संशयास्पद रित्या हा अपघात घडला असून नेमका हा अपघात आहे की घातपात? असा संशय आता घेण्यात येत आहे. तर घटणेनंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मात्र, या संपूर्ण अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून भारतीय न्याय संहितेनुसार जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील मलकापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या कुंड बुद्रुक येथे ही अपघाताची घटना घडलीय. या परिसरात राहणारे पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे (वय 58 वर्ष) हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हॉटेल यादगार नजीक वाहन पकडण्यासाठी ते पायी जात होते. त्यावेळी मुंबई वरून नागपूरकडे (Nagpur) जाणाऱ्या भरधाव (जीजे-15 बिएफ-2564) चारचाकी वाहनाने कवळे यांना वेगाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते हवेत अक्षरशः भिरकावल्या जाऊन दूर अंतरावर जाऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भारतीय न्याय संहितेनुसार पहिला गुन्हा दाखल
अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी नामदेव कवळे यांना मलकापूर येथील उपजिल्ह रुग्णाल्यात भरती केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान अपघातानंतर कार चालक मात्र धडक देऊन फरार झालाय. हा सर्व अपघात सीसीटिव्हीत कैद झाला असून. नेमका हा घात आहे की अपघात, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मलकापूर पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेनुसार जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा दाखल केला असून कार चालकाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. मात्र, या अपघातानंतर राज्यात पुन्हा एक हीट अँड रनचा प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या