![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anandacha Shidha: 'आनंदाचा शिधा'चे वाटप नाही, संतप्त ग्राहकाकडून रेशन दुकानदारावर हल्ला; बुलढाण्यातील घटना
Buldhana Anandacha Shidha: बुलढाण्यात आनंदाचा शिधा आणि गेल्या महिन्यातील गव्हाचं वाटप का केलं नाही....? असा जाब विचारत रेशन दुकानदारास जबर मारहाण करून दुकानाची तोडफोड केली.
![Anandacha Shidha: 'आनंदाचा शिधा'चे वाटप नाही, संतप्त ग्राहकाकडून रेशन दुकानदारावर हल्ला; बुलढाण्यातील घटना Buldghana Anandacha Shidha No distribution of Anandacha Shidha angry customer attacks ration shopkeeper Incidents in Buldhana Anandacha Shidha: 'आनंदाचा शिधा'चे वाटप नाही, संतप्त ग्राहकाकडून रेशन दुकानदारावर हल्ला; बुलढाण्यातील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/6b2b7654290b4c7409118c30c6509708166736986778189_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anandacha Shidha News: राज्यात गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने (CM Eknath shinde) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटप सुरू केले. मात्र हा आनंदाचा शिधा सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी वादात सापडला आहे. बुलढाण्यात आनंदाचा शिधा आणि गेल्या महिन्यातील गव्हाचं वाटप का केलं नाही....? असा जाब विचारत रेशन दुकानदारास जबर मारहाण करून दुकानाची तोडफोड केली. तसेच दुकानातील ई पॉज मशीन फोडणाऱ्या हल्लेखोराला तामगाव पोलिसांनी अटक केली आहे. काल सायंकाळी ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान या गावात घडली.
वडगाव वान येथील रेशन दुकानदार श्रीकृष्ण पिंजरकर आणि त्यांचा नातू ऋषिकेश हे रेशन वाटप करत असताना गावातीलच मोहन कुरवाळे आणि काही नागरिक त्या ठिकाणी आले. त्यांनी रेशन दुकानदाराला आनंदाचा शिधा आणि गेल्या महिन्यातील गहू का वाटप केले नाही? असा जाब विचारला यातून वाद निर्माण झाला. हल्लेखोरांनी रेशन दुकानदार आणि त्यांचा नातू या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात रेशन दुकानाची तोडफोड करण्यात आली तेथील ई पॉज मशीन सुद्धा फोडण्यात आलं. या घटनेने जिल्ह्यातील रेशन दुकानदार संतप्त झाले असून त्यांनी जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जर हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली नाही तर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार हे रेशन वाटप बंद करतील असा इशाराही यावेळेस देण्यात आला.
दरम्यान या घटनेची तामगाव पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, तोडफोड करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य आरोपी मोहन कुरवाडे याला अटक केली आहे. विशेष म्हणजे या परिसरात व या रेशन दुकान दुकानावर अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचलेलाच नाही.
जिल्ह्यातील अनेक भागात आनंदाचा शिधा पोहचलाच नाही
बुलढाणा जिल्ह्यातील फक्त 20 टक्के लोकांनाच आनंदाचा शिधा मिळालेला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त असून रेशन दुकानदाराशी वाद घालताना दिसत आहेत अशा घटना वारंवार घडत असून आनंदाचा शिधा न पोहचल्याने अशा घटना घडत असल्याचे रेशन दुकानदार म्हणत आहेत.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)