औरंगाबादमध्ये सैराट, प्रेमविवाह केला म्हणून भावानेच बहिणीची केली हत्या
Aurangabad Crime News : प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aurangabad Crime News : प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सैराट चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच औरंगाबादमधील (Aurangabad ) लाडगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी (Police) आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव शिवारात भावाने सख्या बहिणीची कोयत्याने वार करुन हत्या केली. कारण काय तर प्रेमविवाह (Love marriage ) का केला? आरोपी अल्पवयीन आहे. तो मुळचा गोयेगाव येथील रहिवाशी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्यानं रागाच्या भरात कोयत्यानं बहिणीचा गळा चिरुन हत्या केली. मृत मुलीचं नाव किशोरी मोटे असे.
19 वर्षीय किशोरीने सहा महिन्यापूर्वी पळून जाऊन पुण्यातील आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ते लाडगाव शिवारात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच भाऊ संकेत मोटे यानं लाडगाव गाठलं. त्यानंतर बहिणीला प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. यावेळी राग अनावर झालेल्या भावाने जवळच असणाऱ्या कोयत्यानं बहिणीवर सपासप वार केले. भावाने इतक्या निर्घुणपणे वार केले की बहिणीचं मुडक शरीरा वेगळं झालं होतं. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवला. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवलं. घटनेचं गांभिर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या घटेनाचा तपास करत आहे.
मुलीने घरातून पळून जाऊन विवाह केल्य़ानंतर काही दिवसांनंतर आईने मुलीची भेट घतेली. त्यावेळी आईने मुलीचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर काही दिवसानंतर मुलगा आणि आई मोटारसायकलवर मुलीच्या घरी आले. अल्पवयीन मुलानं जॅकेट घातलेलं होतं, मुलगी किचनमध्ये होती तो थेट किचनमध्ये गेला आणि मुलीवर सपासप वार केले आणि शरीरापेक्षा डोकं वेगळं केलं. डोकं हातात घेऊन बाहेर आला अन् म्हणाला, आम्ही म्हटलं होतं काही दिवसापूर्वी मुलीचा गळा चिरू आज तो चिरला आहे. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलानं आपल्या बहिणीसोबत प्रेम विवाह कऱणाऱ्याकडे धाव घेतली. तोपर्यंत त्या मुलाने पळ काढला होता म्हणून तो वाचला. मुलाची आई शेतात काम करत होती घटना घडल्यानंतर काही वेळातच गावकरी जमले. पोलिसांना फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल', नैराश्यात गेलेल्या डॉक्टरानं पत्नीसह दोन मुलांची केली हत्या
Bhiwandi : मस्करी पडली महागात; कॉम्प्रेशर मशीनची पाईप गुदव्दारात घुसवून हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू
'चिल्लर' चोर सापडला; हस्तगत नाणी मोजताना पोलिसांना फुटला घाम, पोलिसी खाक्यानंतर गुन्ह्याची कबुली
virar: धक्कादायक : लग्नाचा तगादा लावत असल्याच्या कारणावरून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
Pimpri- Chinchwad : पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी लाचेची मागणी, लाचखोर महिला पीएसआयला बेड्या