Bhiwandi : मस्करी पडली महागात; कॉम्प्रेशर मशीनची पाईप गुदव्दारात घुसवून हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू
मोठ्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनची पाईप मस्करीत तरुणाच्या गुदव्दारात लावून पोटात हवा भरण्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ठाणे : मोठ्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनची पाईप मस्करीत तरुणाच्या गुदव्दारात लावून पोटात हवा भरण्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात घडली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी (वय 32) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतक अब्दुल हा भिवंडीतील खाडीपार भागातील एका चाळीत राहून तो त्याच भागात असलेल्या सिल्क मिल्स लूम कारखान्यात लूम कामगार म्हणून कार्यरत होता. तर दोन्ही आरोपीही याच लूम कारखान्यात लूम कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यातच 26 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास मृतक व आरोपींची कारखान्यात मस्करी सुरु होती. त्यातूनच दोघा आरोपींनी कारखान्यात असलेल्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनची पाईप अब्दुलच्या गुदव्दारात घुसवून मशीन सुरु केली. त्यावेळी गुदव्दारावाटे हवा प्रेशरने पोटात जाऊन आतड्याना गंभीर दुखापत झाली होती. यामुळे भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे . मात्र मस्करीत त्याचा जीव गेल्याने तो राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मृतकचा साडू शबोउद्दीन मन्सुरी यांच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरोधात भादवी. कलम 304, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. आज अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :