Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सर्व नवखे उमेदवार देऊनही एमआयएमने जिल्ह्यावरची आपली पकड आणखी मजबूत केली. 2015 च्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाने फक्त 24 जागा जिंकल्या होत्या

Chhatrapati Sambhajinagar MIM WINNER LIST: अंतर्गत असंतोष, तिकिटासाठी बंडखोरी असतानाही छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM ) पक्षाने जोरदार कामगिरी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम हा आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पक्षाने 33 जागा जिंकल्या आहेत . तर महाराष्ट्रात एकूण 126 जागांवर MIMचे उमेदवार निवडून आले आहेत. 2015 च्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाने फक्त 24 जागा जिंकल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सर्व नवखे उमेदवार देऊनही एमआयएमने जिल्ह्यावरची आपली पकड आणखी मजबूत केली.
एमआयएमने राज्यातील इतर शहरांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. मालेगावमध्ये 21, नांदेड -वाघाळ्यात 14, अमरावतीत 12, धुळे 10, सोलापूर 8, नागपूर 6, अहिल्यानगर आणि जालना येथे प्रत्येकी दोन आणि ठाण्यात 5 जागा MIM ने काढल्या.
शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या गुलमंडीत MIM ची एन्ट्री
गुलमंडी प्रभाग हा पारंपरिकरित्या शिवसेनेचे वर्चस्व असणारा प्रभाग आहे. शहराचा महत्त्वाचा समजला जाणारा या भागात शिवसेना आणि उद्धवसेनेचे उमेदवार निवडून आले असले तरी एमआयएमने पहिल्यांदाच गुलमंडीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसले. या प्रभागात चार पैकी दोन विजयी उमेदवार एमआयएमचे आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलमंडी ही मुख्य बाजारपेठ आहे. गुलमंडी हा प्रभागात 15 अ मध्ये येतो. गुलमंडीवर शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना झाली त्या प्रभागातून पहिल्यांदा ‘ एमआयएम’ चे दोन नगरसेवक निवडून आले.
गुलमंडी परिसरात यावेळी सर्वच प्रमुख पक्षांनी ताकद आजमावली होती. भाजपकडून मिथुन व्यास, जयश्री व्यास, बंटी चावरिया आणि मोनाली पाटणी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे मिलाप चावरिया, प्राजक्ता परदेशी, प्रीती तोतला आणि ऋषिकेश जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली होती.उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने सचिन खैरे, सोनल जैस्वाल, रीना रिडलॉन आणि लक्ष्मीनारायण बाखरिया यांच्यावर विश्वास टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून विजेता चावरिया, निशिगंधा इंगळे आणि प्रमोद नरवडे हे उमेदवार मैदानात होते. दरम्यान, एमआयएमकडून सुमित जमधडे, तरन्नुम अकील, नूरजहान इक्बाल आणि मोहंमद जोहेब यांना गुलमंडीत उमेदवारी देत थेट लढत दिली होती.
राजकीय चढाओढ, अंतर्गत धुसफुस
छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत 2015 मध्ये एमआयएमने 24 नगरसेवकांपैकी 21 जणांना यंदा तिकीट नाकारल्याने धूसफूस वाढली होती. या निर्णयाविरोधात काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.अनेक ठिकाणी जोरदार विरोध झाला. पक्षाचे फोटो फाडण्यात आले.
दरम्यान, निवडणुकीपूर्वी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. काहींनी गाडीच्या मागे धावत त्यांना बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला. यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर नोंदवण्यात आला होता. कलीम कुरेशी त्यांचा भाऊ हबीब आणि साधारण 60 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली होती.
या गदारोळानंतर एमआयएमचे प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी शहरात दोन दिवसात 4 'फूट मार्च' केले. ओवेसी बंधूंनी वारंवार इत्तेहाद (एकता) यावर भर देत पक्षाने निर्माण केलेले राजकीय मैदान वाया जाऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीचा परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या MIM च्या राजकीय यशावर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील MIM च्या 33 उमेदवारांची यादी
प्रभाग 1
अ - अशोक रंगनाथ हिवरे - एमआयएम
ब - विजयश्री यादव - एमआयएम
क - झिनत युनस पटेल - एमआयएम
ड - पठाण अजहर अय्युब - एमआयएम
प्रभाग 5
अ - रुही मोसिन खान - एमआयएम
ब - अब्दुल समीर, साजिद - एमआयएम
क - फरजाना साबेर हुसैन - एमआयएम
ड - अलि मीर वाजिद - एमआयएम
प्रभाग 6
अ - मोहम्मद वासिम अलीम - एमआयएम
ब - शेख नर्गिस सलीम - एमआयएम
क - शेख वाजिया बेगम - एमआयएम
ड - मेराज खान जलील खान - एमआयएम
प्रभाग 9
अ - काकासाहेब काकडे - एमआयएम
ब - शाहीन रहीम पटेल -एमआयएम
क - सदीया अमजद खान -एमआयएम
ड - मतिन माजीद शेख - एमआयएम
प्रभाग 12
अ - शेख फरहतजहाँ - एमआयएम
ब - खान सुमय्या निसार - एमयआयएम
क - मोहम्मद वाजेद - एमआयएम
ड - खान शेर हाजी अब्दुल - एमआयएम
प्रभाग 13
अ - सैय्यद सोहेल - एमआयएम
ब - मोहम्मद अलकेसरी - एमआयएम
क - जोहरा समीन बिन - एमआयएम
ड - सय्यद उसामा अब्दुल - एमआयएम
प्रभाग 14
अ - कुरैशी मलेका बेगम - एमआयएम
ब - खान फिरोज - एमआयएम
क - खान अलमास खानम - एमआयएम
ड - मुन्शी शेख - एमआयएम
प्रभाग 15
ब - अहम्मद तरन्नुम - एमआयएम
क - इकबाल नुरजहाँ - एमआयएम
प्रभाग क्र. 27
सय्यद हमीद सय्यद सुभान
प्रभाग 28
अ - वाहूळ सुनीता मनोज - एमआयएम
ब - खान अब्दुल मतीन - एमआयएम
क - अफसर नसीम बेगम - एमआयएम
ड - शेख साबेर पाशू - एमआयएम




















