एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल', नैराश्यात गेलेल्या डॉक्टरानं पत्नीसह दोन मुलांची केली हत्या

Omicron Variant In India : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे तणावात गेलेल्या डॉक्टरने आपला संपूर्ण परिवाराच संपवला. ही घटना जेवढी खळबळजनक आहे, जेवढीच थरकाप उडवणारी त्याने लिहिलेली नोट आहे.

Omicron Variant In India : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं भारतात शिरकाव केलाय. कर्नाटकमध्ये दोन तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक- एक रुग्ण आढळलाय. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. याच तणावातून एका डॉक्टरने आपला संपूर्ण परिवाराच संपवला. ही घटना जेवढी खळबळजनक आहे, जेवढीच थरकाप उडवणारी त्याने लिहिलेली नोट आहे. ज्यात त्याने लिहिलं की, 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल'. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची हत्या करणारा व्यक्त नैराश्यात होता. या घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार आहे. 

कानपूरमधील कल्याणपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. सुशील कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी नैराश्यातून धारधार शस्त्राने आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर मुलाचा आणि मुलीची गळा दाबून जीव घेतला. कुटुंबातील तिघांची हत्या केल्यानंतर सुशील कुमार यांनी आपल्या भावाला मेसेज करत याबाबतची माहिती दिली. यामध्ये नैराश्यात आपण हत्या केल्याचं मेसेजमध्ये सुशील कुमार यांनी म्हटलं. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत डॉक्टर सुशील कुमार फरार झाला होता. पोलिसांनी तिन्हीही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपी डॉक्टर सुशील कुमार डिविनिटी अपार्टमेंटमध्ये राहत होते तर रामा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना एक डायरी मिळाली.  त्यामध्ये असं लिहिलेलं की, ‘आता हा ओमायक्रॉन व्हेरियंट सर्वांना मारेल. अजून मृतदेह मोजायचे नाहीत. माझ्या निष्काळजीपणामुळेच मी करिअरच्या त्या टप्प्यावर अडकलो आहे. जिथून बाहेर पडणे आता अशक्य आहे. माझं कोणतेही भविष्य नाही.  मी पूर्ण शुद्धीत आपल्या परिवाराला संपवत आहे. त्यानंतर स्वत:चेही आयुष्य संपवणार आहे. याला दुसरं कुणीही जबाबदार नाही.’ 

दरम्यान, केवळ एका आठवड्याच्या आत जगभरातील 40 देशांमध्ये हा ओमायक्रॉन पसरला आहे. भारतातही (India)आतापर्यंत ओमायक्रॉनचे (Omicron)चार रूग्ण सापडले आहेत.  आंतरराष्ट्रीय स्थरावरूनच ओमायक्रॉनबाबत चिंता व्यक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच देशांनी सतर्कता बाळगण्यास सुरूवात केली आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉनच्या प्रसाराबाबत धोक्याची घंटा दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंचा व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदेEknath Shinde on Uddhav Thackeray | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कशी गरीबी कळणार- शिंदेEknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदेABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
Embed widget