एक्स्प्लोर

Breaking News LIVE : तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या संपूर्ण मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार

Breaking News LIVE Updates, 16 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या संपूर्ण मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार

Background

Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

"अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते  (Cyclone Tauktae) चक्रिवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे. रविवारी पहाटे 4 वाजता जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी 2 वाजता जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे." असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी देले आहे. 
 
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तोक्ते  (Cyclone Tauktae) या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. तसेच 15 मे रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ताशी 50 ते 70 कि.मी. वेगाने तर 16 मे रोजी ताशी 60 ते 80 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ दिनांक 16 मे रोजी अंदाजे पहाटे 4 वाजता गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गच्या समुद्रात येणार असून दुपारी 2 च्या दरम्यान सिंधुदुर्गची सीमा ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे 16 मे रोजी पहाटे 4 ते दुपारी 2 पर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

Monsoon : तोक्ते चक्रीवादळाचा मान्सूनला असाही फायदा
दरवर्षी १ जून रोजी हजेरी लावणारा मान्सून यावर्षी एक दिवस आधीच केरळात दाखल होणार आहे. मान्सून यावर्षी सरासरी १०३टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, स्कायमेटने देखील ३० मे रोजीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं म्हटलंय. प्रतीवर्षी सरासरी प्रमाणे १ जून रोजी मान्सून केरळात हजेरी लावत असतो. मात्र, यावर्षी एक दिवस आधीच तो दाखलहोण्याची शक्यता आहे. मात्र यंदा तोक्ते चक्रीवादळामुळे  तो आधीच दाखल होण्यचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामानविभागानं यंदा 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

COVID-19 Vaccination: देशात लसीकरणाचा आलेख पडला; कोरोनाला कसं रोखणार?
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात थैमान घातलं आहे. लसीकरण करणे हे कोरोनाविरोधात सर्वात मोठं शस्त्र मानले जाते. मात्र, सद्य परिस्थिती पाहता देशात लसीकरणाचा वेग समाधानकारक नाही. बर्‍याच राज्यात लसींची तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच लसीकरणाचा आलेख एकदम खाली आला आहे. परिणामी कोरोनाची साखळी कशी तुटेल असे प्रश्न उपस्थित होत आहे.

शुक्रवारी संपूर्ण देशात केवळ 11 लाख 3 हजार लसींचे डोस देण्यात आले. त्यापैकी 6 लाख 29 हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला, तर 4 लाख 74 हजार लोकांना दुसरा डोस देण्यात आला. हा वेग खूप कमी आहे. यापूर्वी गुरुवारी 23 लाख, बुधवारी 21 लाख, मंगळवारी 27 लाख डोस देण्यात आले होते. आतापर्यंत देशात एकूण 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. यापैकी 13.93 दशलक्ष लोकांना पहिला डोस देण्यात आला.

कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचं आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावं : अशोक चव्हाण
राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. यावरुन आता काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप शासित राज्यात परिस्थिती दयनीय झाली असताना फडणवीस मात्र महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचे काम करत असल्याची गंभीर टीका चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

20:57 PM (IST)  •  16 May 2021

राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरीत दाखल, राहत्या घरी ठेवण्यात येणार त्यांचं पार्थिव

राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरीत दाखल, राहत्या घरी ठेवण्यात येणार त्यांचं पार्थिव

20:37 PM (IST)  •  16 May 2021

मी काल जे केलं ते निंदनीय आहे, पण गरजेचं होतं, नाशिकमधील रुग्णालयात तोडफोड केलेल्या राजेंद्र ताजणे यांची प्रतिक्रिया

मी काल जे केलं ते निंदनीय आहे, पण गरजेचं होतं. चुकीचे काही केले नाही, कुणाला  चुकीचे वाटत असेल तर परिणामांना समोर जायला तयार आहे. नाशिकमध्ये रुग्णालयात राडा घालणाऱ्या राजेंद्र ताजणे यांची प्रतिक्रिया. रुग्णांना चांगली वागणूक दिली जात नाही. रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जातोय. 

20:17 PM (IST)  •  16 May 2021

तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या संपूर्ण मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार

तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या संपूर्ण मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

19:40 PM (IST)  •  16 May 2021

मुंबईत आज 1544 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2438 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत आज 1544 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2438 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 6,36,753 रुग्णांची कोरोनावर मात, सध्या 35,702 रुग्णांवर उपचार सुरु

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
Baba Siddique Shot Dead : गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा,  बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
Shahajibapu Patil: अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
Baba Siddique Shot Dead : कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Death Eye Witness :बाबा सिद्दिकींसोबत काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला हत्येचा थरारSanjay Raut Full PC : एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम कुठे असतात? गृहमंत्र्यांची हकालपट्टी कराBaba Siddique Shot Dead : 2 सप्टेंबरपासून आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत होते - सिद्धीकीABP Majha Headlines :  10 AM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
Baba Siddique Shot Dead : गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा,  बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
Shahajibapu Patil: अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
Baba Siddique Shot Dead : कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
कुर्ल्यात भाड्याने खोली, 200000 रुपयांची सुपारी, बाबा सिद्दिकींच्या हत्येचे थेट पंजाब कनेक्शन; नव्या माहितीने खळबळ!
Baba Siddique Shot Dead : सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले,  उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Embed widget