Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Astrology Panchang 13 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
Astrology Panchang 13 October 2024 : आज 13 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस हा फार शुभ असणार आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. तसेच आजच्या दिवशी गुरु शुक्र समसप्तक योगासह (Yog) घनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना (Zodiac Signs) होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेताना आधी 10 वेळा विचार करावा. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना आज कामाच्या ठिकाणी चांगली ऑर्डर मिळेल. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुलं या दिवसाचा भरपूर आनंद घेताना दिसतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्या भौतिक सुख- समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुम्हाला जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल. जोडीदाराकडून आज तुम्हाला भेटवस्तू देखील मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा काळ हा मित्र-परिवाराबरोबर आनंदात जाईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. तसेच, या आठवड्यात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच, नवीन कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फार आनंदात जाईल. देवीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच,नशीबही तुमच्या बाजूने असेल. आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तुमचे पैसेही जास्त खर्च होऊ शकतात. मात्र, तुम्ही पैशांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीचा आजचा दिवस आनंदात जाईल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी आज तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. अनेक योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकाल. तसे, जर तुम्हाला बिझनेसमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आधी तज्ज्ञांचा तसेच घरातील वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घ्या. कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :