Baba Siddique:बॉलीवूडच्या रथी महारथीना जमलं नाही ते बाबा सिद्दिकीनी करून दाखवलं अगदी सलमान आणि शाहरुख सुद्धा त्यांच्या मध्यस्थीसमोर फिके पडले!
बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेचा विषय म्हणजे शहरुख आणि सलमानचं भांडण सोडवण्यात एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले बाबा सिद्दकी यांनीच उचचलं होतं हे पाऊल...
Baba Siddique Death: गोळी झाडून हत्या करण्यात आलेले महाराष्ट्राचे मंत्री बाबा सिद्दकी यांनी एकेकाळी बॉलिवूडनगरीतलं प्रसिद्ध भांडण सोडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा समजला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख चेहरा आणि बॉलिवूडचे सलमान आणि शाहरुख हे दोन स्टार बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या पाच वर्षांच्या वैराला मैत्रीत बदललं. शनिवारी रात्री वांद्रे येथे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी याच्या कार्यालयात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक राऊंड गोळीबार केला, ज्यात त्याच्या छातीत आणि पोटात मार लागला. गंभीर अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
बाबा सिद्दकींनी कसं संपवलं शाहरूख सलमानचं भांडण?
राजकारणातला मातब्बर समजला जाणाऱ्या या नेत्यानं बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातलं भांडण मिटवलं होतं. दीर्घकाळापासून या दोघांमधलं वैर प्रेक्षकांनी अनेक वर्ष चघळलं.२००८ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत या दोघांची मोठी भांडणं झाली होती. त्यानंतर या दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं. या भांडणानंतर त्यांच्यातील संबंध खूप ताणले गेले. पण २०१३ मध्ये बाबा सिद्दकी यांनी या दोघांनाही त्यांच्या इफ्तार पार्टीत आमंत्रित केलं. जिथं या दोन्ही स्टार्सचं वैर संपून त्यांनी एकमेकांनी मिठी मारली. हा क्षण बॉलीवूड आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूप खास होता, कारण दोन सुपरस्टार्समधील वैरामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. या पार्टीनंतर दोघांमधील कटुता संपली आणि आता दोघेही एकमेकांचे चांगले मित्र मानले जात आहेत.
शाहरुख सलमानचा बाँड कायमच चर्चेचा विषय
सलमान खान आणि शाखरुख खान यांच्यातील भांडण आणि मैत्री हा कायमच बॉलिवूडमधील लोकप्रीय कथांपैकी आहे. दोघांनीही त्यांच्या करियरच्या सुरुवातीला एकत्र काम केलं पण नंतर एका भांडणामुळं त्यांच्यात दुरावा आला. 2008 नंतर दोघे वेगळे झाले असले तरी बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीने त्यांना पुन्हा जवळ केले. आता दोघेही एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतात आणि एकमेकांच्या कार्यक्रमांमध्येही दिसतात.
हेही वाचा: