Breaking News LIVE : 31 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन
Breaking News LIVE Updates, 29 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात कोरोनाचा उद्रेक! आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळाला आहे. राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
Maharashtra Lockdown : स्थिती गंभीर! राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.
एनआयएची टीम सचिन वाझे यांना घेऊन मिठी नदीजवळ; नंबर प्लेट, हार्ड डिस्क, डीव्हीआरसह महत्त्वाचे पुरावे हाती
अँटिलीया प्रकरणात चौकशीसाठी एनआयए रविवारी सचिन वाझे यांच्यासमवेत मिठी नदीवर पोहोचली. एनआयएला नदीतून नंबर प्लेट आणि डीव्हीआय यासह अनेक पुरावे सापडले आहेत. डीव्हीआर नष्ट करुन तो नदीत फेकला गेल्याचा संशय आहे. नदीतून दोन सीपीयू आणि एक हार्ड डिस्क डायव्हर्स सापडले आहेत. दोन नंबर प्लेट्स सापडल्या असून दोन्हींवर एकच नंबर लिहिलेला आहे.
Ind vs Eng 2021 | सॅम करनची झुंज अपयशी; 7 धावांनी सामना जिंकत मालिका भारताच्या खिशात
अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने अखेर विजयी पताका उंचावली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकणार याबद्दलचं चित्र अस्पष्ट होतं. सुरुवातीच्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजाची घसरगुंडी आणि त्यानंतर मधल्या फळीनं केलेली कमाल पाहता संघानं विरोधी बाजूला असणाऱ्या इंग्लंडच्या संघापुढे 330 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडचे खेळाडू खेळपट्टीवर आले. पण, कमालीच्या जिद्दीनं मैदनाता उतरलेल्या भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. सलामीवीरांच्या वाट्याला अपयश येतानाचं चित्र असतानाच इंग्लंडच्या संघालाही सामन्यावर पकड मिळवण्यासाठी अखेरच्या विकेटपर्यंत प्रत्येक खेळाडूच्या योगदानाची साथ मिळाली. सॅम करननं संघाला विजयाच्या दारापर्यंत आणून सोडलं, अखेरच्या चेंडूपर्यंत त्यानं सामना जिंकण्यासाठीचे शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण, अखेर त्याची झुंज अपयशी ठरली.
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 4961 कोरोना रुग्णांची नोंद तर 31 बाधितांचा मृत्यू.
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 4961 कोरोना रुग्णांची नोंद तर 31 बाधितांचा मृत्यू.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे 31 मार्चला ऑनलाईन भूमिपूजन होणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे 31 मार्चला होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आँनलाईन भूमिपूजन. कोरोना निर्बंध नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळील जुने महापौर निवासाच्या जागेत होणार आहे, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी. यंदाच्या अर्थसंकल्पात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
31 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे 31 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्याना जवळील जुन्या महापौर निवासाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शिवसेना आमदार माजी मंत्री रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
शिवसेना आमदार माजी मंत्री रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. आज दिवसभरात 41.5 अंश से तापमानाची नोंद.