एक्स्प्लोर

Breaking News LIVE : भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसला आग; परिसरातील नागरिकांनी, अग्निशमन दलाने आग विझवल्याने अनर्थ टळला

Breaking News LIVE Updates, 12 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसला आग; परिसरातील नागरिकांनी, अग्निशमन दलाने आग विझवल्याने अनर्थ टळला

Background

संजय राठोडच्या जागी मला मंत्री करा!, हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाले असून त्यासाठी आता हरिभाऊ राठोड यांनी कंबर कसली आहे. संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून त्यासाठी त्यांनी दोन पत्रंही लिहली आहेत. हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असतं असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. 

MPSC Exam | उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल, परीक्षा आठवड्याभरात होईल: मुख्यमंत्री

काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) केली. परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. राज्यभरातील एमपीएससीचे  विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पवित्रा पाहता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचं आंदोलन संवेदनशीलरित्या हाताळावं अशी सूचनाही केली. 

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन व वेळापत्रकनुसारच घेण्यावर शिक्षण विभाग ठाम

गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा यांनी दहावी बारावी बोर्ड परिक्षेबाबत पालक संघटना, शिक्षक, बोर्डाचे आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये शिक्षणमंत्र्यांनी बोर्ड परिक्षेबाबत पालक, शिक्षकांचे म्हणणे जाणून घेतले. शिवाय, विविध विषय आणि बोर्ड परीक्षा आयोजनाबाबत चर्चा केली. यामध्ये पालकांनी परीक्षा ऑनलाइन घेता येईल का ? हा प्रश्न उपस्थित केला असता परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून, गावखेड्यात कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे व लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे यामध्ये शक्य नसल्याचा शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. 

23:03 PM (IST)  •  12 Mar 2021

ण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 3184 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद.. तर 16 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू... पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. 

20:38 PM (IST)  •  12 Mar 2021

भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसला आग, परिसरातील नागरिकांनी, अग्निशमन दलाने आग विझवल्याने अनर्थ टळला

मुंबईतील भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या 605 क्रमांकाच्या बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने हालचाली करत ही आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भांडुप स्टेशनवरुन वैभव चौकच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. भांडुपच्या अशोक केदारे चौक परिसरात ही बस आली असता बसच्या दर्शनी भागातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच या बसने पेट घेतला. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेत प्रवाशांना मागच्या दरवाजातून बाहेर काढले. तोपर्यंत बेस्ट बसच्या पुढील भागात आग पसरली होती. स्थानिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचले आणि ही आग विझवण्यात आली. पीक अवर असल्यामुळे घटना घडली त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. परंतु वेळीच बसला आग लागल्याचं चालकाच्या निदर्शनास येताच प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

20:07 PM (IST)  •  12 Mar 2021

राज्यात आज 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मुंबईतही रुग्णांचा आकडा वाढताच, आज 1 हजार 646 रुग्ण आढळले, मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू 

19:20 PM (IST)  •  12 Mar 2021

लातूर जिल्ह्यात 128 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

लातूर जिल्ह्यात 1065 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 90 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 419 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 62 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26378 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 932 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 715 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24731 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 49 आहे.

19:14 PM (IST)  •  12 Mar 2021

कोळसा वाहतूक करणाऱ्या महाकाय डंपरला खदानीतच लागली आग

चंद्रपूर : कोळसा वाहतूक करणाऱ्या महाकाय डंपरला खदानीतच लागली आग, शहरालगत असलेली पद्मापुर खुल्या कोळसा खाणीतील घटना, 60 टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता असलेला हा महाकाय डंपर किमान 1.5 कोटी रुपये किंमतीचा आहे, डंपरला आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखून घेतली उडी, याच खाणीत काही दिवसांपूर्वी कोळशाचा भला मोठा थर कोसळून अवजड महागडी यंत्रसामुग्री अजूनही दबली आहे. सरकारी कोळसा कंपनीच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर कामगार नाराज.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget