एक्स्प्लोर

Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा

Breaking News LIVE Updates, 8 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Breaking News Live Updates Maharashtra news latest Marathi headlines February 8 2021 Maharashtra political news International Women's Day 2021 Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा

Background

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

 

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.



मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस

 

 संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर 7 मध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीला सुरूवात होत आहे. 5 फेब्रुवारीला या प्रकरणात शेवटची सुनावणी झाली होती, त्यावेळी कोर्टाने 8 मार्च ते 18 मार्च असे वेळापत्रक सुनावणीसाठी आखलेलं आहे. पण, दरम्यानच्या काळात हे प्रकरण अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालवण्यात यावे अशी याचिका राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.



मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल

 

मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. आज अखेर विमला हिरेन यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

 

बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला. या दरम्यान बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय मंचावर उपस्थित होते.

22:45 PM (IST)  •  08 Mar 2021

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या JEE Main 2021 फेब्रुवारी सेशनचा परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन ही परीक्षा घेण्यात आली. यासोबतच JEE Main 2021 परीक्षेचा फेब्रुवारी सेशनचा निकाल अवघ्या दहा दिवसांमध्ये जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी तीन भाषांमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा यावर्षी तेरा भाषांमध्ये घेण्यात आली होती. देशभरातून 6 लाख 20 हजारांच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यातील सहा विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत 100 पर्सेंटाइल (NTA score) मिळवून टॉपर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रतून सिद्धार्थ मुखर्जी या विद्यार्थ्याने सुद्धा या सहा टॉपर्समध्ये आपले स्थान मिळवले आहे. याशिवाय संकेत जहा, (राजस्थान) ,प्रवीण कटारिया (दिल्ली ),रंजीम दास (दिल्ली) ,गुरमीत सिंग (चंदिगड) ,अनंत किंदबी (गुजरात) या विद्यार्थ्यांनी सुद्धा 100 पर्सेंटाइल गुण मिळवून देशात टॉपर्सचे स्थान मिळवले आहे.
22:51 PM (IST)  •  08 Mar 2021

कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणखीच सतर्क झालं आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रोजच्या आकड्यांनी गेल्या 3 आठवड्यात 80 वरुन आता सुमारे पावणे तीनशेचा आकडा गाठला आहे. गेल्या आठ दिवसात 1705 रुग्णांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याबरोबरच ज्या बिल्डिंगमध्ये कोविड रुग्ण आढळून येतील, त्यामधील सर्व नागिरकांचे टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. काही ठिकाणी टेस्टिंगला विरोध होत आहे. मात्र नागरिकांनी टेस्टिंगला विरोध न करता येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा येत्या काळात कठोर पाऊलं उचलावी लागतील, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे .तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये कठोर कारवाई करावी लागेल. लग्नसमारंभ आणि पार्ट्यांवरही अत्यंत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं. येत्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी न झाल्यास कठोर निर्णय घेण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget