(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे सरकारचे आदेश
Breaking News LIVE Updates, 10 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय महत्त्वाचे निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. ज्याअंतर्गत शुक्रवारी रात्रीपासून राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरु झाला.
राज्यात शुक्रवारी रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत जीवनावश्यक गोष्टींची दुकानं सुरु राहणार असून, सुपरमार्केट मात्र बंद असणार आहेत. तर, कोणालाही कारणाशिवाय प्रवासाची मुभा नसेल.
नागपुरातील खाजगी रुग्णालयात भीषण आग, तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
नागपुरात वाडी परिसरातील वेलट्रीट रुग्णालयात आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. वेलट्रीट रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या वेळेला रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत होते. अनेक जणांना सुरक्षित सुरक्षित बाहेर हलवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली होती.
सरकारकडून राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजास्तव राज्य शासनाला ‘ब्रेक द चेन’ घोषित करून काही निर्बंध लावावे लागले. यामध्ये कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरविण्यात आली. आता यात सुधारणा करण्यात आली असून दि. 10 एप्रिलपासून आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येईल.
बुलडाणा : खामगाव येथील आठवड़ी बाजार भागात भीषण आग
बुलडाणा : खामगाव येथील आठवड़ी बाजार भागात भीषण आग. साडेसात वाजताच्या सुमारास लागली आग. आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक. आगीवार अद्याप नियंत्रण नाही, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमवीर यांच्या चौकशी करण्याचे सरकारचे आदेश
मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमवीर यांच्या चौकशी करण्याचे सरकारचे आदेश,
संजय पांडे यांना दिले प्राथमिक चौकशीचे आदेश,
परमवीर सिंग दोषी असल्यास होऊ शकते सरकारकडून कारवाई ,
30 मार्चला मुंबई पोलीसांनी अहवाल दिल्यानंतर 1 एप्रिलला चौकशीबाबत निघाले आदेश ,
मुंबई पोलिस आयुक्तांच्या अहवालात परमबीर सिंग यांच्यावर ठेवण्यात आलाय ठपका
राज ठाकरे यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया
राज ठाकरे यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना टेनिस खेळताना पाठीला झाली होती दुखापत. त्यामुळे पाठीच्या मसल्स टिशूमध्ये मध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली.
सर्वांच्या साथीची गरज, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन
Maharashtra Lockdown : एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन
आम्ही सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या- देवेंद्र फडणवीस
आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या- देवेंद्र फडणवीस यांची मागणी