एक्स्प्लोर

Breaking News LIVE : कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक

Breaking News LIVE Updates, 06 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक

Background

Maharashtra New Corona Guidelines: मिशन ‘ब्रेक दि चेन’आदेशात सुधारणा, 'या' आवश्यक सेवांचा समावेश
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. काल दिलेल्या ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले . 

Pune Lockdown: पुणेकरांना पुन्हा कडक निर्बंध, सुधारित आदेश जारी
 राज्यात  कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची  संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत. 

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अखेरीस गृहमंत्री झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. 

पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी आढावा बैठक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच गुरुवारी 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीचं आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही निर्बंध लागू केले आहेत. अशातच मोदी पुन्हा देशव्यापी  निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.



 

20:22 PM (IST)  •  06 Apr 2021

अमरावतीत लॉकडॉऊन शिथिल करण्याची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील लॉकडॉऊन शिथिल करण्याबाबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली असून पालकमंत्री यशोमती ठाकूर ह्या आज मुंबईला रवाना झाल्या असून उद्या मुख्यमंत्री यांना स्वतः भेटून करणार मागणी... अमरावती जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध.

20:04 PM (IST)  •  06 Apr 2021

शासनाने निर्देश झुगारून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू ठेवणाऱ्या मालेगाव गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज विरोधात गुन्हा दाखल

मालेगाव : शासनाने निर्देश झुगारून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू ठेवणाऱ्या मालेगाव गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज विरोधात मालेगाव महापालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत गुन्हा दाखल केला व दंडात्मक कारवाई केली. मालेगाव शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केल्याने कोरोना प्रसार रोखण्यासाठी शहरातील शाळा व कॉलेज बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले असताना  मालेगाव गर्ल्स हायस्कुल ही पूर्ण क्षमतेने सुरु होती. पोलीस व महापालिकेने शिताफीने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

20:00 PM (IST)  •  06 Apr 2021

कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक

कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आदेश. रिपोर्ट नसतील तर सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल : जिल्हाधिकारी. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. इतर जिल्ह्यातील प्रादूर्भाव पाहता कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी कडक सूचना.

19:45 PM (IST)  •  06 Apr 2021

बुलडाण्यात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना व्यापाऱ्यांचा घेराव

बुलडाण्यात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना व्यापाऱ्यांचा घेराव. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून आज 6 एप्रिल पासून 30 पर्यंत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला वंचित बहुजन आघाडीनंतर बुलडाणा शहरातील व्यापाऱ्यांनी देखील विरोध दर्शवत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात घेराव घालण्यात आला. यावेळी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना साखळी तुटण्यास मदत होणार नाही. नागरीक रस्त्यावर  फिरतच आहे. तर आमच्या आस्थापना बंद असल्यामुळे कोरोना कमी होणार का असा प्रश्न उपस्थित करत आठवड्यातील 5 दिवस काही तासाकरीता आस्थापने उघडण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.

18:58 PM (IST)  •  06 Apr 2021

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाचा निर्णय घेण्यात आला आहे.  यापूर्वी 31 मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.  कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Vikas AGhadi : निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
Raj Thackeray:
"मला एक खून माफ करा", राज ठाकरेंची राष्ट्रपतींना विनंती; भर सभेत असं का म्हणाले?
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddique : सिद्दीकी हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत; तपास सुरू - फडणवीसBaba Siddique Bishnoi Gang : दाऊद आणि सलमान खानसोबत संबंध ठेवल्यानं सिद्दीकी यांची हत्याChhagan Bhujbal on Baba Siddique : बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणावरून छगन भुजबळांचा संतापNana Patole : मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्यातील पोरगा मोठा होतोय, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Vikas AGhadi : निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
Raj Thackeray:
"मला एक खून माफ करा", राज ठाकरेंची राष्ट्रपतींना विनंती; भर सभेत असं का म्हणाले?
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
Chhagan Bhujbal: 'जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याचीही..', बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याचीही..', बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
Baba Siddique Shot Dead : गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा,  बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
Shahajibapu Patil: अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
Embed widget