एक्स्प्लोर

Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates, 17 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background

पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजलीय : शरद पवार 

काल पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरु आहे तिथं मी स्वतः दोन-तीनवेळा जाऊन आलोय. दुर्दैवाने त्या आंदोलनात सामील झालेल्या घटकाबाबत केंद्र सरकारची भूमिका सामंजस्याची आहे असं मला दिसत नाही. त्या आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी, राजस्थान इथले आहेत. त्यात ही पंजाबचाच आकडा जास्त दिसतो. त्यामुळं आमचं केंद्र सरकारला सांगणं असतं की, पंजाबचा शेतकरी अस्वस्थ होऊन देऊ नका, असं पवारांनी म्हटलं. 

पवारांनी म्हटलंय की, पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे. अगदी इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत ही किंमत दिलेली आहे. दुसरीकडे याच पंजाब मधील सर्व शेतकऱ्यांनी अन्न पुरवठ्यासाठी प्रचंड योगदान सतत दिलेलं आहे. या देशाच्या संरक्षणाचा विषय जेंव्हा येतो, तेंव्हा महाराष्ट्रात तुम्ही भाषणं देता. इंच-इंच लढवू म्हणता पण पंजाबच्या सीमेवरील माणूस खऱ्या अर्थाने त्याला तोंड देतो. असा त्याग करणारा घटक काही प्रश्नांसाठी आग्रह धरत असेल, तर त्याकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज आहे, असंही पवार म्हणाले. 

Mumbai Drug Case : एनसीबीकडून आर्यन खानचं काउन्सिलिंग; सुटकेनंतर चांगलं काम करेन, आर्यनचं समीर वानखेडेंना आश्वासन

Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्स केस प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला (Aryan Khan)  मुंबईच्या सेशन कोर्टाच्या विशेष NDPS कोर्टाकडून जामीन मिळणार की, नाही? याचा निर्णय 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आर्यन खानसह इतर सर्व आरोपींची रवानगी आर्थर रोडच्या कारागृहात करण्यात आली आहे. आर्यन खानने एनसीबी (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी विश्वास दिला आहे की, आतापासून मी नवं आयुष्य सुरु करणार आणि चांगलं काम करुन नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करिन. 

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं समुपदेशन (काउन्सिलिंग) करण्यात आलं. त्यादरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आर्यन खाननं आश्वासन दिलं आहे की, तो गरिबांचं कल्याण करण्यासाठी काम करणार असून यापुढे स्वतःच्या नावाला कलंक लागेल असं, काहीही वागणार नाही. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सल्लामसलत केली. आर्यन खान म्हणाला की, त्याच्या सुटकेनंतर तो गरीबांसाठी काम करणार आहे. तसेच इथून पुढे कोणतंही चुकीचं काम करणार नाही. 

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केवळ ड्रग्स जप्त करुन कारवाई करत नाही, तर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांचं काउन्सिलिंगही करतं. ड्रग्जमुळे होणारं शारीरिक, मानसिक नुकसान आणि समस्यांबाबत एनसीबीचे अधिकारी ड्रग्सच्या विळख्यात आलेल्या पीडितांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे स्वतः तरुणांची काउन्सिलिंग करतात. क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खानचं काउन्सिलिंगी समीर वानखेडेंनी केलं.

Kerala Floods : केरळमध्ये पावसाचा हाहाःकार; आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

केरळमध्ये आभाळ फाटलंय. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. परतीच्या पावसामुळं अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली असून अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचलं आहे. त्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्टायम जिल्ह्यातच आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला असून 13 जण अद्याप बेपत्ता आहेत.

08:04 AM (IST)  •  17 Oct 2021

Kerala Floods : केरळमध्ये मुसळधार पाऊस; आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Kerala Floods : केरळमध्ये आभाळ फाटलंय. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. परतीच्या पावसामुळं अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली असून अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

08:04 AM (IST)  •  17 Oct 2021

परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस; काढलेल्या सोयाबीनच्या नुकसानीची शक्यता

परभणी : परभणीत काल रात्रीपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. परभणी शहरासह जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे सोयाबीन काढणी थांबली असुन ज्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन काढले आहेत त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अगोदरच यंदा परभणी जिल्ह्यात सरासरीच्या जास्त पाऊस झालाय ज्यात साडे चार लाख हेक्टर वरील नुकसान झालेले आहे त्यातून जे काही वाचले आहे ते पदरात पाडून घेण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहेत मात्र पुन्हा पाऊस सुरु झाल्याने ते ही हाथी लागण्याची शक्यता आता मावळली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटनाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Embed widget