एक्स्प्लोर

Kerala Floods : केरळमध्ये पावसाचा हाहाःकार; आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Kerala Floods : केरळमध्ये पावसानं थैमान घातलं असून आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पावासाममुळं अनेक जण बेपत्ता झाले असून मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्याची मागणी मुख्यमंत्री विजयन यांनी केली आहे.

Kerala Floods : केरळमध्ये आभाळ फाटलंय. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. परतीच्या पावसामुळं अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली असून अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचलं आहे. त्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्टायम जिल्ह्यातच आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला असून 13 जण अद्याप बेपत्ता आहेत.

केरळात पुरामुळं परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अनेक भागांत मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात आहे. एनडीआरएफची 7 पथकांनीही मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. एअर फोर्सलाही मदत कार्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आजपासून 21 ऑक्टोबरपर्यंत भक्तांसाठी खुलं होणार आहे. अयप्पा देवाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भक्त मंदिरात येऊ शकतात. त्यात पुरस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.

2018 आणि 2019 प्रमाणे परिस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना निर्देश 

कोट्टयम, इडुकी आणि पथनमथिट्टा जिल्ह्यांतील डोंगर परिसरांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी 2018 आणि 2019 मध्येही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2018 मध्ये आलेल्या पुरामुळं केरळात मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. त्यावेळी जवळपास 450 हून अधिक लोकांनी जीव गमावला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजयन यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, पूरस्थितीचा सामना करण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले. तसेच राज्यातील सर्व पर्यटन स्थळं पुढिल सुचनेपर्यंत बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget