एक्स्प्लोर

BMC Election : मुंबई महानगरपालिकेसाठी आदित्य ठाकरेंचा ॲक्शन प्लॅन रेडी

BMC Election : मुंबई पालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेची युवा ब्रिगेड सज्ज झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना महानगरपालिकेच्या रणांगणांत उतरणार आहे.

मुंबई : निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे, प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी वेगवेगळे ॲक्शन प्लॅन तयार करतोय. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची धुरा आदित्य ठाकरे सांभाळणार आहेत. याच आदित्य ठाकरेंच्या (AADITYA THACKERAY) नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा मानस आहे त्यासाठी सेनापतीनं ॲक्शन प्लॅन तयार केला आहे.

मुंबई पालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेची युवा ब्रिगेड सज्ज झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना महानगरपालिकेच्या रणांगणांत उतरणार आहे. भाजप मनसेसोबत शिवसेनेसमोर महाविकास आघाडीतल्या कॉंग्रेसचंही आव्हान असणार आहे. त्यामुळे युवा नेतृत्वाला  यंदाच्या निवडणुकीत कोणतीही जोखीम पत्करायची नाही. त्यासाठी आदित्य ठाकरेंनी ॲक्शन प्लॅन सुरु केलाय. 

आदित्य ठाकरेंचा मुंबई मनपासाठीचा ॲक्शन प्लॅन 

  • शिवसेनेचे 97 नगरसेवक सध्या पालिकेत आहेत 
  • या 97 वॅार्डाच्या व्यतिरिक्त शिवसेना 40 ते 50  वॅार्डावर काम करत आहेत 
  • त्यापैकी मागच्या निवडणुकीत 23 उमेदवार हजार मतांच्या आत  पराभूत झाले होते
  • त्यापैकी 18 उमेदवार हे मुंबई उपनगरातले आहेत
  • योगायोग असा की, आदित्य ठाकरेही उपनगरचे पालकमंत्री आहेत 
  • या 18 वॅार्डांत आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम जास्त काम करत आहेत. 

मुंबई उपनगरात डीपीडीसी माध्यमातून जास्तीत जास्त नागरी सेवा पुरवणे, वॅार्ड निहाय विकास आराखडे तयार करून ते लवकरात लवकर पुर्णत्वास नेण्यावर सध्या भर दिला गेला आहे. 

हे झालं फक्त उपनगराबाबतीत पण आदित्य ठाकरें बीएमसीच्या वॅार्ड अधिका-यापासून ते आमदार आणि शाखाप्रमुखांच्या माध्यमातून 
वॅार्डावॅार्डावर नजर ठेऊन आहेत. शंभरीचा आकडा पार करून स्वबळावर पालिकेवर भगवा फडकवण्याचं आदित्य ठाकरेचं स्वप्न आहे. या 23 वॅार्डाशिवाय 20 वॅार्ड असे आहेत जे मागच्या वेळेस काही कारणांमुळे थोडक्यात गेले होते. 

बंडखोरी, उमेदवार देण्यात गडबड, वॅार्ड रचना इत्यादी कारणांमुळे शिवसेनेने 20 जागा गमावल्या होत्या मागच्या वेळेची कसर यंदा भरून काढण्यावर टीम आदित्यचा जोर आहे. जे 97 वॅार्ड ताब्यात आहेत त्या नगरसेवकांशी डायरेक्ट चर्चा 
आमदार आणि खासदारांच्या मार्फत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे. प्रत्येक वॅार्ड निहाय आधी केलेल्या विकासकामांचे उद्धाटन सोहळे, वॅार्ड अधिका-यांच्यामार्फत विकास कामंचं व्हिजन तसेच ते पूर्ण करून घेण्यावर भर आहे.  शिवसेना आमदरांच्या दर पंधरा दिवसांनी बैठका, विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांना घराघरात पोहचवण्याचे आदेश, पदाधिका-यांची मोळ बांधणे, नवे युवा कार्यकर्ते तयार करण्यावर भर आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने आतापर्यंत तीन ते चार सर्व्हे केले आहेत. त्यामध्ये शिवसेना 100 च्या वर जाते असं चित्र आहे. पण आदित्य ठाकरेंचं सुरुवातीपासून महापालिकेसाठी मिशन 150 राहिलं तेव्हा  आदित्य ठाकरेंचा ॲक्शन प्लॅन हे मिशन यशस्वी करणार का? हे लवकरच कळणार आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या :

मुंबई महापालिकेची वाढवलेली प्रभाग संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारीत

Aaditya Thackeray : नववर्षात आदित्यपर्व! आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचं धनुष्य आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget