लाजीरवाणा प्रकार! 5 वर्षानंतरही दिव्यांग क्रिकेट खेळाडू बक्षिशाच्या प्रतीक्षेतच; सरकारला स्वतःच्याच घोषणेचा विसर
2019 मध्ये भारताच्या दिव्यांग क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली होती. मात्र आज याच सरकारला स्वतःच्याच घोषणेचा विसर पडला असल्याचे चित्र आहे.
Blind Cricket T20 World Cup 2019 : टीम इंडियाने (Indian Cricket Team) दक्षिण आफ्रिकेचा टी-20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये दारुण पराभव करत टी-20 वर्ल्ड कप उंचावला आहे. तमाम भारतीयांचे 17 वर्षांपासूनचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे आणि भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरुन 17 वर्षाचा दुष्काळ संपवला. या विजयानंतर देशभरात आनंदाची आणि नव्या उत्साहाची लाट पसरली होती. त्याचा प्रत्यय अगदी मुंबईच्या मरीन ड्राईव आणि वानखेडेच्या मैदानात देखील बघायला मिळाला. तर दुसरीकडे त्याचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील बघायला मिळाले. मात्र, टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचे विधिमंडळात जोरदार सत्कार करणारे हेच महाराष्ट्र सरकार 2019 ला केलेली स्वतःची घोषणा विसरले आहे का? हा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जातोय. त्यामागील कारण देखील तितकेच धक्कादायक आहे.
राज्य सरकारला स्वतःच्याच घोषणेचा विसर?
2019 मध्ये भारताच्या दिव्यांग क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकला होता. त्या दिव्यांग टीम मध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडू होते. त्यामुळे त्यांचा सत्कार करून प्रत्येकाला पाच लाख रुपये रोख बक्षीस देण्याचे महाराष्ट्र सरकारने तेव्हा जाहीर केले होते. मात्र, आज ही घोषणा करून पाच वर्षे उलटले असले तरी महाराष्ट्र सरकार ने विश्वविजेता संघातील महाराष्ट्रातील तीनही खेळाडूंचा न सत्कार केला आहे, ना त्यांना रोख बक्षीस दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार 2019 ला केलेली स्वतःची घोषणा वाऱ्यातच विरली का? खरंच महाराष्ट्र सरकारला खेळाडूंप्रती आत्मीयता आहे का? असे अनेक सवाल या निमित्याने उपस्थित केले जात आहेत.
भारतात पुढचा विश्वचषक याच डिसेंबर महिन्यात
धक्कादायक बाब म्हणजे 2019च्या विश्वचषकानंतर आता पुढचा विश्वचषक याच वर्षी डिसेंबर महिन्यात भारतात होणार आहे. त्यामुळे तेव्हाचे दिव्यांग खेळाडू आता यंदाच्या विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. मात्र जुन्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळेला सरकारने केलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सरकारने स्वत: केलेल्या घोषणेची आठवण होणार आहे का? अशी माफक अपेक्षा व्यक्त जात आहे.
बीसीसीआयने जाहीर केले 125 कोटी रुपयांचे बक्षीस
टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयानंतर बीसीसीआयने संघासाठी 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. बक्षीसाची ही रक्कम संघाचे खेळाडू, राखीव खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्यात वाटण्यात येणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचे वाटप कसे होणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तसेच आयसीसीने देखील 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम टीम इंडियाला दिली आहे. बक्षीस रकमेतील काही रक्कम कर म्हणून कापली जाते. खेळाडूंना त्यांच्या फीसह व्यावसायिक फी म्हणून पैसे दिल्यास, त्या रकमेवर टीडीएस कापला जाणार नाही. हा पैसा खेळाडूंच्या उत्पन्नात परावर्तित होईल आणि आयटीआरमध्ये आयकर निश्चित केला जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या