देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की, हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे; संजय राऊतांचा आरोप, व्हिडीओ ट्वीट
Maharashtra Politcs: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोरच पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut Tweet : भाजप (BJP) पदाधिकाऱ्याकडून देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या घरासमोरच पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी केला आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केला आहे. हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारं आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
भाजप पदाधिकाऱ्याकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोरच पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्वीट केला आहे. भाजप पदाधिकाऱ्याकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच, हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मुक्काम पोस्ट : नागपूर, उपमुखयमंत्री आणि गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान, असं म्हणत संजय राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करताना स्थळही सांगितलं आहे.
नागपूर येथील उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमुख पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुकी केली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच, पोलिसांच्या कॉलरला हात घातल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे:
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 17, 2023
मुक्काम पोस्ट:नागपूर
उपमुखयमंत्री व गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान.
पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्का बुक्की केली.खाकी वर्दी चया कॉलरला हात घातला..
स्पष्ट दिसत आहे.
महाराष्ट्र इतका… pic.twitter.com/a2dbAgWAAT
ट्वीटमध्ये संजय राऊतांनी काय म्हटलंय?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट, नागपूर, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान, पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमुख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्काबुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता."
महत्त्वाच्या इतर बातम्या :