Raosaheb Danve : ...तर आम्ही शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू; रावसाहेब दानवेंचा इशारा
सर्व आमदार आणि खासदार हे मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.
जालना: यांचं लग्न आमच्याशी ठरलं आणि हे पळून गेले दुसऱ्यासोबत. यांनी आमच्यासोबत दगाफटका केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. जालन्यातील राजूरमध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅडच्या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. राज्यातल्या बारा कोटी जनतेला बुरे दिन आणून या मुख्यमंत्र्याला तर अच्छे दिन आले असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर सर्व आमदार, खासदार नाराज आहेत असंही ते म्हणाले.
राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर निर्माण झालेल्या प्रश्नावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, "इम्पेरिकल डेटा द्या असं दोन वर्षांपासून सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला सुचवतंय. मात्र हे सरकार अपयशी ठरत आहे. इम्पेरिकल डेटाचा आणि केंद्राचा काहीही संबंध नाही. राज्यातले सर्व ओबीसी मंत्री हे फक्त शोभेची वस्तू आहेत."
मला कोथळा काढण्याचा अधिकार: संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. आपल्याकडे विरोधकांना बदनाम करण्याची सुरुवात झाली ती हिटलरनीती आहे. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले, पण आपण नैतिकता सांभाळत बसलो, पण तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा मुंबईत आयोजित केला होता. त्यामध्ये ते बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या:
- राज्यात अजित पवार, रावसाहेब दानवेंसह 372 मंत्र्यांची लाखो रुपयांची वीजबिल थकीत, ऊर्जा विभागाकडूनच यादी जाहीर
- दानवे म्हणाले, 'ब्राम्हणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो', अजितदादा म्हणतात, तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात
- Sanjay Raut : जर तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार; संजय राऊतांचा भाजपला इशारा