एक्स्प्लोर

रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..

परभणीत 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयजी शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Parbhani: परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयजी शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अटक करण्यात आलेल्यांमध्ये 41 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणताना धरपकड केली असून, रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले गेले नाही. असंही परभणीचे आयजी शहाजी उमाप यांनी सांगितलं.

सुरक्षेसाठी  SRPF च्या तुकड्या

सुरक्षेसाठी फिक्स पॉइंट आणि SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी चर्चा करत आहेत. विविध ठिकाणी घटना घडल्यामुळे विलंब झाला, मात्र आता आम्ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या घटनांमध्ये 9 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, सोशल माध्यमांवरील व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करण्यात येणार असल्याचे आयजी उमाप यांनी सांगितले आहे.

पंचनाम्यानला आजपासून सुरुवात

परभणी शहरात बुधवारी दुपारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आता शांतता पसरली आहे स्वतः नांदेड परिक्षेत्राचे आईजी शहाजी उमप परभणी ठाण मांडून असून परभणी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या दंगलखोरांनी शहरात धुडघूस घालून नुकसान केले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. परभणी शहरासह जिल्हाभरात शांतता पसरली असून कुणीही कायदा हातात घेऊ नये, अस आवाहन स्वतः उमप यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही परभणीकरांना शांततेचा आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले असून आजपासून मनपा आणि तहसीलदार यांच्या वतीने हे पंचनामे केले जाणार आहेत.

सुषमा अंधारेंचे कॉम्बिंग ऑपरेशवरून सरकारला ताशेरे

कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल, तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्याऐवजी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उध्वस्त करणे आणि बर्बाद करणे, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget