संजय राऊत ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल, म्हणाल्या, शिव्या देणं हा त्यांचा इतिहास
संजय राऊत (Sanjay Raut) ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड आहे, असं म्हणत भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Chitra Wagh on Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड आहे, असं म्हणत भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार हल्लाबोल केला. नीलम गोऱ्हेंवर ( Neelam Gorhe) राऊतांनी टीका केल्यानंत चित्रा वाघ यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. संवैधानिक पदावर असणाऱ्या नीलम ताई गोऱ्हे यांच्याबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे संजय राऊत बोलतात. ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
महिलांबद्दल वाईट बोलणं त्यांना अश्लील शिव्या देणं हा संजय राऊतांचा इतिहास
संवैधानिक पद जाऊ द्या पण एका महिलेबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे संजय राऊत बोलतात. महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणं त्यांना अश्लील शिव्या देणं हा संजय राऊतांचा इतिहास आहे असेही चित्रा वाघ म्हणाल्या. त्यांनी स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या अश्लील शिवीगाळची क्लीप आज ही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. अशा संजय राऊतांना....नाठाळ संजय राऊतांना आता महाराष्ट्रातील महिलांनीच वठणीवर आणलं पाहीजे असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निलम गोऱ्हेंवर ' निर्लज्ज, नमकहराम..' अशी टीका केली होती. मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणारे नीलम गोऱ्हे यांचे कालचे वक्तव्य आहे. ही त्यांची विकृती आहे. ज्या घरात तुम्ही खाल्लं, आमदार झाल्यात त्या विरोधात आज बोलत आहात. मला आठवत आहे बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली. काही लोकांच्या मर्जी खातीर त्या आल्या, गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. त्या बाईंचं कर्तृत्व काय? विधान परिषदेत हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यात महानगरपालिकेत आमचे गटनेते होते अशोक हरनाळ त्यांची मुलाखत घ्या. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचा प्लानिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणा कोणाच्या नावावर या बाईने कोट्यावधी रुपये गोळा केले? हे गटनेते अशोक हरणळ यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सडीज प्रकरण काय आहे ते त्यांना कळेल. अशी घणाघाती टीका करत संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर तोफ डागली.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Shirsat: निलम गोऱ्हेंना निर्लज्ज म्हणता.. लाज वाटते का? संजय शिरसाटांनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले
























