एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार; विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा संकल्प
भाजपने निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं आहे. रोजगारनिर्मिती, नदीजोड प्रकल्प, ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था, वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, शेती आदी महत्त्वाच्या विषयांवर जाहीरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : भाजपने निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं आहे. भाजपने संकल्पपत्रात दुष्काळमुक्त महाराष्ट्रचा संकल्प केला असून दुष्काळ, पाणी आणि रोजगार या तीन गोष्टीवर जास्त भर दिला आहे. रोजगारनिर्मिती, नदीजोड प्रकल्प, ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था, वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा, ग्राम विकास, रेल्वे विकास अशा विविध विषयांवर जाहिरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे.
भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थित संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. संकल्पपत्र प्रकाशनाच्यावेळी गुरू ठाकूर लिखित आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेले 'पुन्हा आणुया आपलं सरकार' हे प्रचार गीत लाँच करण्यात आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, पाणी आणि रोजगार या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश संकल्पपत्रात केला आहे. महापुराचं पाणी जे समुद्राला जातं, हे वाया जाणारं पाणी वळवून दुष्काळग्रस्त भागाला नेण्याची योजना असल्याचं फडणवीस म्हणाले. पायांभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न करणार असून कोकणातलं पाणी गोदावरी खोऱ्यात आणू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं
भाजपच्या संकल्पपत्रातील 16 ठळक मुद्दे
-दुष्काळमुक्ती (पश्चिम घाटातील पाणी मराठवाड्यात वळवणार)
- मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 11 धरणांना जोडून मराठवाड्याचे दुष्काळनिर्मूलन
- 1 करोड नोकऱ्या निर्माण करणार
- 1 करोड लोकांना बचत गटाशी जोडणार
- 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार
- राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र तंत्र अवगत करणार
- प्रत्येक घरात वीज आणि शुद्ध पाणी
- भारत नेटच्या माध्यमातून सर्व घरांना इंटरनेटशी जोडणार
- शिक्षण मूल्यांवर आधारित करणार
- सोशल सिक्युरिटीत कामगारांना आणणार
- शहिदांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन धोरण
- विस्थापितांचे योग्य पुनर्वसन धोरण
-शेतीसाठी दिवसा 12 तास अविरत वीजपुरवठा देण्याचा संकल्प
- सौर ऊर्जेचा वापर करून प्रदूषणमुक्ती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement