(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashish Deshmukh : काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगडं मारु नयेत, पुतण्याची अनिल देशमुखांवर टीका
Ashish Deshmukh On Anil Deshmukh : निवडणुकीच्या वेळेला भाजप विरोधात त्यांना निवडणूक लढवायची आहे, हे लक्षात घेऊन ते खोटे आरोप करत आहेत. असा दावा भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे.
Nagpur News नागपूर : काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र सलील देशमुख (Salil Deshmukh) त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी बातमी आली होती. त्या घडामोडी पासून सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुख यांनी गेले दोन दिवस देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप करणे सुरू केले आहे. अनिल देशमुख गेले दोन वर्ष निष्क्रिय राहिले, मतदारसंघात त्यांनी काही काम केले नाही आणि आता निवडणुकीच्या वेळेला भाजप विरोधात त्यांना निवडणूक लढवायची आहे, हे लक्षात घेऊन ते खोटे आरोप करत आहेत. असा दावा भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. या सोबतच अनिल देशमुख माझे कुटुंबिय सदस्य आहेत. म्हणून मला त्यांची चिंता आहे. मात्र काका (अनिल देशमुख) यांनी लक्षात ठेवावे, जे स्वतः काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्याच्या घराला दगड मारत नाही. असा टोलाही आशिष देशमुख यांनी अनिल देशमुखांना लगावला आहे. ते नागपुरात बोलत होते.
आशिष देशमुखांचे थेट आव्हान, म्हणाले..
"मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असं आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगण्यात आले, पण मी ते आरोप केले नाहीत, असा सनसनाटी दावा महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केला आहे. शिवाय अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते. त्यानंतर माझ्याकडे क्लिप्स आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे क्लिप्स आहेत असं म्हटल्यानंतर आता अनिल देशमुखांनी थेट चॅलेंज दिलं आहे. माझ्या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. तसेच पुरावे फडणवीसांकडे असतील तर त्यांनी ते जनतेसमोर आणावे, असे अनिल देशमुखांनी थेट चॅलेंज केले. आता यात भाजप नेते आशिष देशमुख यांनी उडी घेत काका अनिल देशमुखांवर टीका करत खुले आव्हान दिले आहे.
काचेच्या घरात राहणारे दुसऱ्याच्या घराला दगड मारत नाही- आशिष देशमुख
अनिल देशमुख यांची ओळख महाराष्ट्रात एक फॅशनेबल नेते म्हणून आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालतात आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी एक फॅशन म्हणून आणि एक ट्रेण्ड म्हणून काल पेन ड्राईव्ह दाखवला असेल. माझे अनिल देशमुख यांना आव्हान आहे, जर तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये खरंच काही पुरावे असतील, तर तुम्ही ते पुरावे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे. अनिल देशमुख माझे कुटुंबिय सदस्य आहेत म्हणून मला त्यांची चिंता आहे, मात्र काका (अनिल देशमुख) यांनी लक्षात ठेवावे, जे स्वतः काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्याच्या घराला दगड मारत नाही. अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख काटोलमधून लढू इच्छितात. पक्ष श्रेष्ठींनीही त्यांना शब्द दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे. असा टोला ही आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या