एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजपने सरकार पाडण्याचा मुहुर्त सांगणारा ज्योतिषी बदलला तरी सरकार स्थिर; शंभूराज देसाईंचा टोला

Shivsena BJP : सरकार पाडण्याचा मुहूर्त सांगणारे ज्योतिष भाजपने बदलले तरी सरकार स्थिर असल्याचा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.

Shivsena BJP : महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे मुहूर्त सांगणारे ज्योतिष भाजपने बदलले. मात्र, सरकार अजून स्थिर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले. तेढ निर्माण झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार आणि गृह विभाग सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई वाशिम येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राणा  दाम्पत्याने हनुमाना चालिसा  पठणाच्या मुद्यासह ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जून महिन्यात महाविकास आघाडीच सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरही देसाई यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, कुणाला  काय पठण करायचं, चालीसा  मंत्र पठन  करायचं त्यांनी आपल्या  घरी  किवा खाजगी  ठिकाणी करावं. मात्र, मातोश्री  निवासस्थानी  करणार आणि आव्हान देणार असेल तो अधिकार कुणाचाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांचे हेतू काय आहेत, हे कळून येत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपने सरकार पाडण्याचा मुहूर्त सांगणारे ज्योतिष बदलले आहेत. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपापूर्वी सरकार पडणार असल्याचे सांगत होते. त्यानंतर दोन महिन्यात, कुणी सहा महिन्यात सरकार पडणार असल्याचे भविष्य सांगितले. मात्र अडीच वर्ष होऊन गेले. मात्र सरकारवर किंचितही परिणाम झाला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याचा मुहूर्त सांगायचे. त्यांचा मुहूर्त लागू पडेना म्हणून राणे आता मुहूर्त सांगणार गुरुजी झाले. मात्र, त्यांचाही मुहूर्त फसवा निघणार असल्याचे देसाई यांनी म्हटले. 

राज ठाकरे  यांच्या सभेवर  बोलताना राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना सांगितले की,  राज्यातील  कायदा आणि सुव्यस्था राखण्याची  जबाबदारी पोलीस दलाची आहे.  राज्यात कोणाची कुठे  सभा  होत आहे. कोणत्या सभेत  कुठे कोण काय बोलतोय.  यापेक्षा  कुणाच्या वक्तव्या मुळे वाद निर्माण होत असेल, समाजात तेढ निर्माण होत असेल तर ती  नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार आणि गृह विभाग सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचंABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Embed widget