Walmik Karad : संतोष देशमुखांचा मारेकरी धनुभाऊ-दादांच्या बॅनरवर झळकला, वाल्मिक कराडचे परळीत बॅनर
Santosh Deshmukh Murder Case : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडे हा बीडमधील बॅनरवर झळकल्याचं दिसून आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो झळकला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळीमध्ये शुभेच्छांचे जे बॅनर लावले होते त्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो दिसून आला. त्यामुळे बीड जिल्ह्यात याची चर्चा सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर परळी शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मात्र आरोपी वाल्मिक कराड याचा देखील फोटो झळकला आहे.
Walmik Karad Banner Parli : परळी शहरभर बॅनर
परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर, पोलिस ठाणे परिसर आणि रेल्वे उड्डाणपुलावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर चक्क वाल्मिक कराड याचा फोटो लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असून त्याच्या दोषमुक्तीवर 22 जुलै रोजी निर्णय होणार आहे. आता त्याआधीच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त वाल्मिकचे फोटो झळकल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी
एकेकाळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणारा वाल्मिक कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील मुख्य आरोपी आहे. पवनचक्की खंडणी प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे उघड झाले. याच प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे यांच्या हत्येचाही आरोप
वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगर याने वाल्मिक कराडवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माझ्यासमोर वाल्मिक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्यांचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं असा आरोप त्याने केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकी वाल्मिक कराडने दिली होती, असा आरोप विजयसिंह बांगर याने केला.
ही बातमी वाचा:






















