एक्स्प्लोर
पुन्हा मंत्रिमंडळात घ्या, धनजंय मुंडेंच्या बॅनरला जेसीबीतून दुग्धाभिषेक; गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने धनंजय मुंडेंना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Dhananjay munde JCB milk jalana
1/8

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने धनंजय मुंडेंना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. बीडसह विविध जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.
2/8

धनंजय मुंडेंनी वाढदिवसाच्या अगोदरच मी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे म्हटले होते, तसेच कार्यकर्त्यांनी हार-तुरे, पुष्पगु्च्छ किंवा सेलीब्रेशन न करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. मात्र, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
3/8

जालन्यात धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला जेसीबी द्वारे दुग्धाभिषेक करण्यात आला. जेसीबीमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला दूध ठेऊन मुंडेंच्या बॅनरवर दूध टाकण्यात आलं
4/8

आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जेसीबीद्वारे दुग्धभिषेक करत, समर्थकांकडून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी केली जात आहे.
5/8

माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात त्यांच्या प्रतिमेला जेसीबी द्वारे दुग्धाभिषेक घालण्यात आला,आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फुले उधळत या ठिकाणी जेसीबीतून प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला.
6/8

जालन्यातील कार्यकर्ते एकत्र येत जेसीबीच्या सहाय्याने चक्क डिजिटल बॅनरवर दूध टाकून वाढदिवसानिमित्त घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या, अशी मागणी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
7/8

दरम्यान, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्ह्यातील आरोपी हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमातून काहीसे अलिप्त दिसले.
8/8

सरपंच देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून स्वत: धनंजय मुंडेंनी हे मान्य केले होते. त्यामुळे, त्यांच्याबद्दल रोष व्यक्त करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
Published at : 15 Jul 2025 02:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























